Subscribe Us

प्रश्न एकच ह्यावेळी श्रावण महिना २ महिने आहे का? सोमवाराचे ८ सोमवार उपवास करायचे का?

प्रश्न एकच ह्यावेळी श्रावण महिना २ महिने आहे का? सोमवाराचे ८ सोमवार उपवास करायचे का? आम्ही दरवर्षी नवनाथ पारायण वाचतो मग ते कधी वाचन करायचं? असे एक ना अनेक प्रश्न आहेत.


ह्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर एकच ते म्हणजे श्रावण महिना दरवर्षी प्रमाणे एकच महिना आहे.


कॅलेंडरवर  अधिक श्रावण, निज श्रावण असं लिहलेलं असल्यामुळे श्रावण महिन्याबाबत संभ्रम निर्माण होणं स्वाभाविक आहे. त्यातच, Social media व वर्तमानपत्र ह्यावरही वेगवेगळी माहिती देणारे मतप्रदर्शन बघायला मिळत आहे.


सविस्तर सांगायचं झाल्यांस  सौरवर्ष व चांद्रवर्ष यांच्यांत दरवर्षी साडेएकरा दिवसांचा फरक पडतो .कालगणनेच्या सोयीसाठी, ह्यांत मेळ घालण्यासाठी दर ३२ महिन्यां नंतर एक अधिक महिना घेतला जातो. व हे अंतर पुर्ववत केले जाते. अधिक महिन्यांत रविची संक्रांत होत नाही.ह्या महिन्यांस पुढील महिन्याचे नाव असते. जसे, ह्यावर्षी आषाढ महिन्यानंतर व श्रावण महिन्यापुर्वी अधिक महिना येत असल्यांने अधिक श्रावण असे म्हटले आहे. साधारणतः फाल्गुन ते अश्विन हे महिनेच अधिक महिने येतात. अधिक महिन्यालाच पुरुषोत्तम मास, मल मास, धोंड्याचा महिना अशी नावंही प्रचलित आहेत.


वर्तमानपत्र व Social media वरील चर्चेचा विषय बघता उत्तर भारतांत पौरोहित्य करणार्‍या मंडळींनी,ज्योतिषींनी ८ सोमवार करा, दोन महिने श्रावण महिना आहे, असे मत प्रदर्शित केलं आहे. त्यांच्या व आपल्याकडील  कालगणनेत ही फरक  आहे.  त्या भागांत पौर्णिमा ते पौर्णिमा महिना असतो. आपल्याकडे अमावस्या ते अमावस्या महिना असतो .


 १७ जुलै २०२३ ला मध्यरात्री अमावस्या संपुन १८ जुलै २०२३ पासुन अधिक महिना.सुरु होत आहे.तर  १६ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी ०३ वाजुन ०७ मिनिटांनी अधिक महिना संपेल , व नेहमीप्रमाणे, दरवर्षी प्रमाणे श्रावण महिना सुरु होणार आहे. अधिक श्रावण व निज श्रावण ह्यामुळे संभ्रम झाला असला तरी त्या महिन्यांची विभागणी वरील प्रमाणे आहे. थोडक्यात,१८ जुलै ते १६ ऑगस्ट २०२३ अधिक मास व १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर २०२३ हा श्रावण मास आहे त्यामुळे, जावायाला, ब्राम्हणाला, गाईला वाण देणे, अधिक माहात्म्य वाचणे, आईची पुजा करुन आईची ओटी भरणे, देवालयांतील देवांना, गंगेला वाण देणे हे सर्व १८ जुलै ते १५ ऑगस्ट ह्या दरम्यांन करायचं आहे. तसेच, श्रावणांतील व्रत-वैकल्य, सोमवार व इतर उपवास, पारायण वाचन हे सगळं १७ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर २०२३ ह्या दरम्यांन करायचे आहे. इतर कोणत्याही माहितीनुसार नव्हे तर वरील प्रमाणे श्रावण महिन्याची व्रत-वैकल्य, उपवास करायचे आहेत.


अधिक महिन्यांत दशमी, एकादशी, द्वादशी, पौर्णिमा ह्या विशेष तिथींना दान देण्याचं अधिक महत्त्व आहे.त्याच प्रमाणे पंचपर्व म्हणजेच वैधृती योग, व्यतिपात योग,अमावस्या, पौर्णिमा, द्वादशी तिथी हि पंचपर्व,त्यांची दानंही महत्त्वाची आहेत. अधिक मासांत गंगास्नानाचंही तितकंच महत्त्व आहे. अनेकजण अधिक मासांत संपुर्ण महिनाभर गंगास्नान करतात. दान देतांना अनारसे, बत्तासे, रेवड्या, मोदक,बर्फी तसेच सप्तधान्याची दानं दिली जातात. अनारसे, बत्तासे ह्यासारख्या वस्तु ३३ नग ह्या प्रमाणांत देतात.दान शक्यतो तांब्याच्या पात्रांत द्यावे. तांब्याचे ताम्हण घेऊन त्यावर पळसाच्या पानाची पत्रावळ ठेवावी.त्या पत्रावळीवर थोडेसे गहु ठेवुन त्यावर दान द्यायची वस्तु ठेवावी. हळद-कुंकु वाहुन वस्तुवर तुळशी पत्र ठेवावं.त्यावर रुमाल,उपरणं झाकुन त्यावर दिपदान ठेवुन तुपाची वात लावावी. दान देणार्‍या व्यक्तीचं पुजन करुन यथाशक्ती प्रमाणे दान वस्तुवर दक्षिणा ठेवुन ते दान संबंधित व्यक्तिला द्यावे. वस्त्रदानही देता येते. अर्थातच,काय द्यावे? किती प्रमाणांत द्यावे? हा प्रत्येकाच्या इच्छाशक्तीचा व आर्थिकतेचा प्रश्न आहे. त्यामध्ये कोणतेही बंधन नाही. सक्ती नाही.


आईने केलेल्या कन्यादाना बद्दलची कृतज्ञता म्हणुन अधिक मासांत मुली आपल्या आईची साडी, खण-नाराळाने ओटी भरतात.


अधिक मासांत विष्णु स्वरुप देवतांचं विशेषतः कृष्णाचं महत्त्व जास्त असल्यांने कृष्णाला महिनाभर तुळस वाहणे, दररोज थोडासा लोण्याचा नैवैद्य दाखवुन तो एका लहान बाळ-गोपाळाला देणे असे अनेक उपक्रम करता येतात.


श्रावण महिन्यांतील सोमवार २१ ऑगस्ट, २८ ऑगस्ट, ४ सप्टेंबर, ११ सप्टेंबर ह्याचं दिवशी श्रावण सोमवार उपवास करायचे आहेत


वरील प्रमाणे थोडक्यांत, अधिक मास व श्रावण मास ह्यांची माहीती देण्याचा प्रयत्न आहे. ह्यामुळे, संभ्रावस्था निश्चितच दुर होण्यांस मदत होईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या