Subscribe Us

श्री नवनाथ भक्तिसार अध्याय :- ५ (मराठी भाषांतर )

       श्री नवनाथ भक्तिसार
 अध्याय :- ५ (मराठी भाषांतर ) 

मच्छिंद्रनाथांचा पिशाच्यावर स्पर्शसत्राचा प्रयोग )



॥ श्री गणेशाय नमः ।। श्री सरस्वत्यै नम: ।। श्री गुरूभ्यो नम: ||श्री नवनाथ सिद्धांना नमस्कार असो.
                     हिंगळादेवीचा आशिर्वाद घेतला व मच्छिंद्रनाथ पुढे तीर्थ यात्रेला निघाला. बारामल्हार नावाच्या एका विस्तीर्ण अरण्यमय प्रदेशात तो गेला.वाटेत रात्र झाली. मध्यरात्रीच्या सुमारास त्याला जाग आली. रानातुन पुष्कळशा दिवट्या पेटलेल्या इकडून तिकडे जात आहेत, पुन्हा परत येत आहेत, अशा त्यांच्या येरझाऱ्या चालल्या आहेत, असे त्याला दिसले. “ही भुतावळ दिसते, यावेळीच तिला बश करून घ्यावे. न जाणो, पुढे आपल्या कार्याला उपयोग होईल.'' भुतांचा सुध्दा काहीतरी उपयोग होऊ शकतो, असा मच्छिंद्राने विचार केला. त्याने अंबेने त्याला शिकविलेले स्पर्शसत्र योजिले. त्याचा परिणाम असा झाला की, भुतांची पावले भूमीत रूतून बसली. त्यांना काहीच हालचाल करता येईना. ती व इतर अनेक भुते मिळून आठप्रकारची आठ कोटी भुते वेताळाच्या अधिपत्याखाली त्या रात्री जमाबयाची होती.इतर सर्व भुते वेताळापाशी भुते कमी दिसताच वेताळ म्हणाला,बारा मल्हार अरण्यातील भुते का दिसत नाहीत? जा ! शरभतीरी जा. त्यांना बोलावून आणा .’’लगेच पाच सात भुते वायूवेगाने बारामल्हार वनभागात आली. तिथे पाहतात तर काय कित्तेक भुते भूमीने घट्ट पकडून धरलेली आहेत .झाडे जागा सोडत नाहीत तशी स्थिर पुढे जाऊन त्यांनी विचारले. ‘’का? हो असे कसे चिटकून राहिले’’
                      ती बंदिस्त भुते त्यांना म्हणाली, ' काय झाले कळत नाही, आम्ही येरझारा करीत होतो, तोच अचानक भुमीकडे खेचले गेलो आणि पाय "चिकटून राहिले. कोणीतरी सिध्दयोगी आला असावा. त्याचेच हे काम!" मग वेताळाने पाठविलेल्या भुतांनी पर्वत व अरण्य यांत हिंडून खूप शोध केला. ती गावातही आली. दुरून दुरून ती गुप्तपणे पाहात चालली, तो त्यांना मच्छिंद्रनाथ एका ठिकाणी सिध्दासन घालून बसलेला दिसला. रात्रीसुध्दा त्याच्याभोवती प्रकाश पसरला होता. मुद्रा तेजस्वी दिसत होती. त्यातले एक भुत पुढे होऊन मच्छिंद्रनाथांना नम्रपणे म्हणाले, “स्वामी या भुतांना तुम्ही उगाच का बरे अडकवून ठेवले? त्यांना कृपा करून मुक्त करा.'' त्यावर मच्छिंद्रनाथ म्हणाला, “त्या वेताळाला मी भीत नाही जाऊन त्यालाच सांगा तुझी भुते मी सोडणार नाही." भुते म्हणाली, “स्वामी! आगीशी खेळू नका. तुमचे भले होणार नाही. वेताळाने ब्रह्मांडाचा चेंडू करून खेळ मांडला, तर देवदानव सुध्दा पळापळ करतील!” मच्छिंद्रनाथ म्हणाला, “ तुमच्या तोंडच्या वल्गना येथे नको आहेत. येऊ दे बेताळाला. पाहतो कोण एवढा बलिष्ठ आहे तो! “बरे, बरे! पाहाच आता!!'' असे म्हणून ती भूते वेताळाकडे गेली. वेताळाला नमन करून ती म्हणाली, “महाराज, आपल्या भुतांना एका योग्याने अडकवून ठेवले आहे. तुमची सुध्दा अशीच गत करीन, अशा धमक्या तो देतो." ते ऐकून वेताळ संतापला. त्याने आज्ञा दिली. त्याबरोबर सर्व भुतांची प्रचंड सेना त्या भयाण रात्री मच्छिंद्रनाथाकडे आरडाओरडा करीत जाऊ लागली.
                       सर्व भुतगणांसह वेताळाला बघताच, मच्छिंद्राने, विभुतीची एक रेषा आपल्याभोवती काढली, वज्ञास्त्र मंत्राचा जप केला आपल्या  मस्तकावर ते मंतरलेले भस्म लावले. तिकडून भुतांनी भयंकर मारा केला, पण त्यांची शस्त्रास्त्रे मध्येच थांबून परत गेली. भुतांचे मुख्य जे आठ जण होते, ते तंर स्मशानातले वृक्ष उपटून त्याच्यावर फेकू लागले. पंण मच्छिंद्रनाथांना काहीही झाले नाही. सर्व वृक्ष त्यांच्या डोक्यावर तरंगत राहिले. मग पिशाच्यांनी दगड, लाकडे इत्यादी फेकली आणि त्यावर अग्नीचा वर्षाव केला, पण सगळे फुकट. जलदास्त्र योजुन त्याने सर्व अश्नी शांत केला आणि स्वत:चे अश्नीअस्त्र जपुन त्यानं भुतांभोबती जाळ उत्पन्न केला. भुते अग्नीला भिऊन मधूनमधून अदृश्य होऊ लागली व समुद्राचे पाणी आणून अस्नी शांत करू लागली. पण आग विझेना. मग ती आकाशात उडाली. मच्छिंद्राने पर्जन्यासत्र सोडून अग्नी थंड केला. भुते पुन्हा भुमीवर उतरली. लगेच त्याने स्पर्शासत्र मंत्रून त्यांना सर्वांना भुमीवर खिळवून टाकले, पण आठ भुतपती स्पर्शार्त्राला न जुमानता त्याच्या भोवती तरंगत राहून त्याला त्रास देऊ लागले, तेव्हा मच्छिंद्राने पुन्हा वज़मंत्र म्हणून आपले संरक्षण केले आणि मंत्रशक्तीनेच सात दानव उत्पन्न केले. मधु, तिल, कुंभकर्ण, मरू, मोलीमल, मुचकुंद व त्रिपुर, असे सात भयंकर दानव प्रत्येक भुतपतीशी कुस्ती खेळू लागले. त्यांचे तुंबळ मल्लयुध्द चालू झाले, ते युद्ध रात्र, एक दिवस व पुढची एक रात्र एवढा वेळ चालूच राहिले. त्यात अस्त्रांचाही भयंकर उपयोग केला गेला, पण शेवटी साती दानवांनी भुतपतीचाही पराभव केला. ते गुप्त झाले. तसेच दानवही गुप्त झाले. तिकडे अंतराळातून आठवा वासवार्त्राशी भिडत होता व आपल्या शक्ती त्यावर टाकीत होता. पण वासवास्त्राचा त्याच्या छातीवर छेद होऊन तो मुर्च्छित पडला. त्यावेळी मच्छिंद्राने बासवारत्र आवरून घेतले व वांताकर्षण अस्त्र फेकले. त्यामुळे तो व इतर सातही भूतपती त्याच्याकडे आकृष्ट झाले व समोर येऊन तडफडत पडले. त्यांचे चलनवलनच थांबले.
                 वातास्त्राचा प्रभावच असा होता. तेव्हा सगळे आठहीजण आपसांत म्हणाले, “या जोग्या समोर आपले काही चालत नाही. आता शरण जाण्याशिवाय गत्यंतर नाही.' आणि असे म्हणून, ते मच्छिंद्रनाथाला शरण गेले व म्हणाले, “ महाराज, तुमच्या प्रतापाची सीमा झाली. मागे सूर्यावर संपाती धावला व त्याने आपले पंख जाळून घेतले, तसे आम्ही झालो. आता उशीर करू नका, आमचे प्राण वाचवा. नाहीतर आम्ही मरून आणखी कुठल्यातरी बाईट स्थितीला जाऊ. आपण जर आमचे प्राण वाचविलेत, तर तुम्ही जे सांगाल ते कार्य करू, पण. दया करा, आम्हाला सोडवा. आमचे प्राणच चालले!” मच्छिंद्रनाथ म्हणाले. “मी शाबरीविद्या हा काव्यमय मंत्रग्रंथ रचिला आहे. त्यातील मंत्रांना देवाप्रमाणेच तुमचेही सहाय्य मिळाल पाहिजे. कोणीही जो मंत्र म्हणाले, त्याचा तो मंत्र तुम्ही सफल केला पाहिजे." त्यावर भुतपती म्हणाले, “मान्य आहे! आम्ही तुम्हाला प्रत्येक मंत्राचे साधन प्रयोग सांगतो.'" मग मच्छिंद्राने त्यांना वाताकर्षण अस्त्रातुन सोडविले.  त्यामुळे फार आनंदित होऊन मच्छिंद्राला त्यांनी प्रत्येक मंत्राची पूजा, उपचार, अभ्युत्थान व जपविधी सांगुन ग्रहण काळात त्यांचे अनुष्ठान केल्यास ते शीघ्र फलदायी होतील अशी व्यवस्था केली. मंत्रानुष्ठानाच्या वेळी भुतबली कोणते द्यावेत, तेही सांगितले. त्यानंतर सर्व म्हणजे आठ कोटी भुते भुमीवर प्रकट होऊन “स्वामी! स्वामी! !'' म्हणून त्यांच्या पाया पडू लागली. त्या सर्वांना मच्छिंद्रनाथाने मुक्त केले. सर्व भुतपिशाच्चे, अष्ट प्रमुखांसह व वेताळासह त्यांच्यासमोर हात जोडून उभी राहिली आणि त्यांनी त्याचा जयजयकार केला. मग अष्टभुतपर्तीनी एकूणएक भुतास अशी समज दिली की, “मच्छिंद्रनाथाने दिलेल्या मंत्राचे पठण करणाऱ्यास तुम्ही ने चुकता साह्य केलेच पाहीजे.” मग मच्छिंद्रनाथ म्हणाले, “जसा हा वर दिलात, तसाच आणखी एक वर द्या. तुमचे व माझे हे युध्द झाले, त्याची कथा जो संग्रही ठेवील, वाचील, त्यावर संकट आले, तर ते दूर करावे, त्याला तुम्ही स्वत:त्रास देऊ नये, त्याच्या घरात प्रवेश करू नये, संकटापासुन त्याचे व त्याच्या परिवाराचे रक्षण करावे. तुम्ही मला शरण आलात ना? मग 'ही शपथ सर्वांनी घ्या व ती पाळा!” मच्छींद्रनाथाचे हे म्हणणेही सर्व भुतांनी व त्यांच्या प्रमुखांनी मान्य केले. त्यांनी मच्छिंद्रनाथाला वारंबांर नमन करून स्वस्थानी प्रयाण केले व नंतर मच्छिंद्रनाथ बारा मल्हारांचे दर्शन घेऊन कालिकादेवीच्या दर्शनासाठी निघून गेला.

अध्याय फलश्रुती:- घरात भूताबाधा असेल, तर थांबेल व पुनः होणार नाही.

अध्याय समाप्त

मागील अध्याय ⬅️

➡️पुढील अध्याय

( वाचण्यासाठी अध्याय वर क्लिक करा )

अध्याय १ ( समंधवाधा नाहीशी होईल )

अध्याय २  धनप्राप्ती व सर्वत्र विजयप्राप्ती होईल

अध्याय ३ शत्रुनाश होईल व घरात मारुतीचे वास्तव राहील 

अध्याय ४ शत्रूंचा पराभव होईलव राजदरबारी मान मिळेल 

अध्याय ५ घरात भूत, पिशाच बाधा होणार नाही

अध्याय ६ शत्रूचे मनात बदल कपट जाऊन मित्र होईल 

अध्याय ७  चौऱ्यांशी लक्ष योनीत जन्म येणार नाही

अध्याय ८ दूरदेशी गेलेला मित्र परत येऊन चिंता दूर होईल

अध्याय ९ चौदा विद्या व चौसष्ट कला हस्तगत होतील 

अध्याय १० श्रीदोष नाहीसे होतील, मन निष्कपट होईल

अध्याय ११ अभिय नष्ट होईल व ग्रहदोष जातील

अध्याय १२ सर्व देवतांचा क्षोभ जाऊन सर्व देवांचा अनुग्रह मिळेल

अध्याय १३ स्त्री-हत्येचा दोष नाहीसा होवून पूर्वजांचा उद्धार होईल

अध्याय १४ कारागृहातून मुक्तता होईल व निर्दोषपणे राहील

अध्याय १५ घरातील कलह नाहीशे होऊन सुखशांती लाभेल

अध्याय १६  दुष्ट स्वप्नांचा नाश होईल.

अध्याय १७ योगसिद्धी प्राप्त होऊन सन्मार्ग लाभेल

अध्याय १८ ब्रह्महत्येचा दोष जाऊन कुंभीपाक नरकातून पितरांचा उद्धार

अध्याय १९ परमानंदकारक मोक्षमार्ग मिळेल

अध्याय २०  मन ताब्यात येऊन प्रपंच सुखात होईल

अध्याय २१ गोहत्येचे पातक नाहीसे होऊन तपोलोकात जाता येईल

अध्याय २२ विद्यावंत पुत्र प्राप्त होऊन तो विद्वानांना मान्य होईल

अध्याय २३ घरातील सोने टिकून ते शिल्लक राहील

अध्याय २४ बालहत्या दोष नाहीसे होऊन मुले सुखी होतील

अध्याय २५ मनुष्यजन्मच प्राप्त होईल व शाप बाधणार नाही

अध्याय २६ गोहत्येचा दोष जाईल व मुले शत्रुतुल्य होणार नाहीत

अध्याय २७ हरवलेली वस्तु सापडेल, पूर्वीचा अधिकार परत मिळेल

अध्याय २८  गुणवान स्त्रीशी लग्न होईल व अखंड सेवा करील

अध्याय २९  क्षयरोग बरा होईल व त्रिविध ताप जाईल

अध्याय ३०  चोरांची दृष्टी नाहीशी होईल

अध्याय ३१  शाबरी मंत्राचे कपटी प्रयोग आपल्यावर होणार नाहीत

अध्याय ३२  जीवावरील गंडांतर नाहीसे होईल व आयुष्य वाढेल

अध्याय ३३  धनुर्वात होणार नाही, असल्यास बरा होईल

अध्याय ३४  सर्व कार्यसिद्धी होऊन यश मिळेल

अध्याय ३५  महासिद्धी मिळून बेचाळीस पिढ्यांचा उद्धार होईल

अध्याय ३६  साप व विंचू यांचे विष उतरून मनुष्य बरा होईल 

अध्याय ३७  दुश्चितपणा नाहीसा होऊन विद्या प्राप्त होईल

अध्याय ३८  हिवताप, नवज्वर व इतर ताप नाहीसे होतील

अध्याय ३९  युद्धात विजय प्राप्त होईल

अध्याय ४० मनोकामना पूर्ण व नवनाथ भक्तिसार वाचल्याचे पुण्य !


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या