श्री नवनाथ भक्तिसार
अध्याय :- ७ (मराठी भाषांतर )
(मच्छिंद्रनाथ व वीरभद्र युध्द)
॥ श्री गणेशाय नमः ।। श्री सरस्वत्यै नम: ।। श्री गुरूभ्यो नम: ||श्री नवनाथ सिद्धांना नमस्कार असो.
मच्छिंद्रांना कालिकादेवी अनुकूल झाली. ते पुढे उत्तरेकडे निघाले. उत्तर कोकणात हरिहरेश्वर तीर्थ आहे, तेथे तो गेला. त्याने गदातीर्थात स्थान केले ब पर्वताला प्रदक्षिणा घालण्यास सुरूवात केली; तो त्याला वाटेत बीरभद्र हा शंकराचा पुत्र मनुष्यरूपात भेटला. तो स्नानाला चालला होता. भरिशूळ, डमरू आदि आयुघे त्याने धारण केली होती, मच्छिंद्राने सुध्दा नाथ संप्रदायाची भुषणे धारण केली होती. प्रदक्षिणेच्या बाटेबर त्यांची दृष्टादृष्ट झाली. बीरभद्राने मच्छिंद्राला बाटेत पाहून विचारले, "काय हो स्वामी, कोण तुम्ही?" “मी मच्छिंद्र” उत्तर आले. ''मच्छिंद्र! पंथ कुठला तुमचा? अभ्यास काय करता ?'' मच्छिंद्रनाथ म्हणाला, “मी जोगी, शैली, शिंगी, कथा, मुद्रा 'ही आमची भुषणे. कानाला छिद्र पाडण्याचा संस्कार आहे.'' बीरभद्राने त्याची ब त्यांच्या पंथाची हेटाळणी केली. तो म्हणाला, “उगाच पाखंड मिरवू नकोस. मुद्रा कसल्या नि कान कसले फाडलेस? तुझा गुरू तरी कोण? बेदविधीच्या विरूध्द पुर्णपणे अपराध करून भलताच पंथ त्याने निर्माण केला आहे हा. तो मुर्खाहून मूर्ख आहे.'' वीरभद्राकडून झालेली गुस्ननिंदा मच्छिंद्राला मुळीच सहन झाली नाही. तो म्हणाला, “तू परनिंदा कशाला करतोस? तुझा गुरू खोटा आहे. तुझे दर्शन झाल्यामुळे मला पुन्हा स्नान करावेसे वाटते. ''
वीरभद्र ते ऐकून संतप्त झाला. त्याने आपले भयंकर धनुष्य ताणून त्यावर तीक्ष्ण बाण लावला. तो मच्छिंद्रावर बाण सोडणार तोच मच्छिंद्र खदाखदा हसला. बाण तसाच राहिला. वीरभद्राला मच्छिंद्र म्हणाला, “कशाला सोंग आणतोस? वीराचे सोंग आणणारा बहुरूपी खरा शूर असतो का?" वीरभद्रही चिडून दुरूत्तरे करू लागला व मच्छिंद्रही प्रतिशब्द बोलून त्याचा धिक्कार करू लागला. त्याचा राग अनावर झाला, तेव्हा वीरभद्राने बाण मारण्याचा निश्चय करून म्हटले, ''अरे जोगड्या, हा आला बघ बाण. मरणाला तयार हो!" तेव्हा मच्छिंद्राने भस्माची चिमुट घेऊन आपल्याभोबती वज़्ारत्राचे कवच तयार केले. ते अभेद्य कवच झाल्यावर पुन्हा वज़्मंत्र जपून, त्याने बीरभद्राने फेकलेल्या बाणावर आपला बाण सोडला. आकाशात दोन्ही अस्त्रे परस्परांवर आदळली. वीरभद्र ब मच्छिंद्र परस्परांवर अस्त्रामागून अस्त्रे फेकू लागले. जे अस्त्र प्रगट होईल त्याविर्ध्द अस्त्र मारण्याचा मच्छिंद्राने सपाटाच लावला. बीरभद्राने सर्वनाश करणारे कालास्त्र प्रेरित केले, तेव्हा मुळमायेच्या शक्तीने प्रलय करणारे अस्त्र निर्माण केले. त्याचा परिणाम असा झाला की, कालाचाही घास करून त्या अस्त्राने पृथ्वी, आग, तेज, वायु व आकाश यांचे एकत्र मिश्रण केले. सर्वच सृष्टीचा प्रलय चाललेला पाहून, देव मच्छिंद्राला म्हणाले, अरे कविनारायणा, कलियुगाचा अजुन कितीतरी काल जायचा आहे. तू सर्वच नाहीसे करू नकोस!'' ते ऐकून मच्छिंद्राने वासनिकासत्र योजिले. तेव्हा काल व मायाप्रलय यांच्या जागी नवनिर्मिती करण्याची ब्रम्हप्रेरणा मात्र उरली आणि पुन्हा पंचमहातत्वे वेगळी व्यवस्थित झाली. तेव्हा ब्रम्हा, विष्णू व महेश्वर हे तिघे व्यक्त रूप घेऊन वेगळे वेगळे तिथे आले ब त्यांनी मच्छिंद्र व वीरभद्र यांचे हात परस्परांच्या हाती देऊन परस्परांशी त्यांचा परिचय वब सख्य करून दिले.
वीरभद्र म्हणाला, मी शिवपुत्र, देवांचा मुख्य वीर आहे. आजपर्यंत मला युध्दात हरविणारा वीर मी पाहिला नव्हता. पण मच्छिंद्राने माझां रार्ब हरण केला. मच्छिंद्रा! तू सांग, तुझी कोणती इच्छा पूर्ण करू?" मच्छिंद्र म्हणाला, 'वीरभद्रा, माझी इच्छा मानवजातीवर उपकार करण्याची आहे. त्यासाठी शाबरीविद्या मी ग्रंथरूपाने रचली आहे. त्यातील मंत्र म्हणणाऱ्यांना फळ मिळेल असे कर.'' वीरभद्राने ते मान्य केले. मग मच्यछिंद्राने तिन्ही देवांना वंदन केले. विष्णूने त्याला वर दिला, “वत्सा! संकटग्रस्त माणसाने जर माझे स्मरण केले, तर मी त्याचे रक्षण करीन'', विष्णुने त्याला चक्रासत्र दिले. मग शंकराला मच्छिंद्राने नमन केले. तेव्हा मच्छिद्राला त्याने त्रिशुलास्त्र दिले ब्रम्हदेव म्हणाले “जे शब्द तू वाणीने उच्चारशील, ते खरे होतील.” त्यानंतर इंद्राने वज्रास्त्र , कुबेराने सिध्दीचे मंत्र, वरूणाने जलास्त्र, अशी अस्त्रे दिली. वरूणाच्या अस्त्राने भुमीतून आपोआप पाणी उत्पन्न होण्याचे सामर्थ्य मच्छिद्रनाथाला प्राप्त झाले. अग्नीनेही अभ्नि - मंत्र दिला. तसेच अश्विनी कुमारांनी मोहिनीमंत्र दिला. मग देव आपापल्या ठिकाणी जाण्यास निघाले; तेव्हा मच्छिंद्राने मनकर्णिका - स्नान करण्याची इच्छा प्रकट केली. देवांनी कौतुकाने त्याला विमानातून नेण्याचे ठरविले. विष्णूने त्याला वैकुंठात नेले. तेथे तो एक वर्षभर राहिला. तो नित्य मनकर्णिकेत स्नान करी व विष्णूच्या नित्य संगतीत राही. एक वर्षानंतर मच्छिंद्राला कैलासनाथ व इतर देवांनी स्वत:च्याब निवासस्थानी.राहण्यास नेले. अशा रितीने देव, यक्ष-गंधर्वांदींचा पाहुणचार स्वीकारला, सात वर्षांनी निरोप घेऊन मच्छिंद्र पृथ्वीवर पुन्हा उतरला. .
त्यानंतर मच्छिंद्र पश्चिम भागात वज्रभगवतीचे मोठे तीर्थक्षेत्र होते, तेथे गेला. त्याने देवीचे दर्शन घेऊन वंदन केले. तेथे त्याला तीनशे साठ कुंडे दिसली. ज्यांत उष्ण पाणी होते. ते पाहून त्याला आश्चर्य वाटले. मग त्याने स्वत: उष्ण पाण्याचे आणखी एक कुंड निर्माण करून देवीला तुष्ट करण्याचे ठरविले. त्याने देवीच्या पुजाऱ्याला विचारले, “ ही कुंडे केव्हा कोणी निर्माण केली?" पुजारी म्हणाला, “पुर्वी वसिष्ठक्रर्षींनी मोठा यज्ञ केला. बारा वर्षे व बारा दिवस यज्ञ चालला होता. सर्व देवता त्या यज्ञासाठी आल्या व येथे राहिल्या. त्यांनी ही अलौकिक कुंडे निर्माण केली व आपापली नावे त्यांना दिली.'' ते ऐकून मच्छिद्राने एक उंचशी जागा पाहून, तेथे आपास्त्रमंत्राचा जप केला. त्यामुळे भुमीतून पाणी उप्तन्न झाले. तेव्हा त्याने अभ्निमंत्र म्हणून एक बाण त्या कुंडात उभा रूतविला, त्यामुळे अग्नीचा प्रवेश त्या पाण्यात होऊन पाणी उष्ण झाले. त्याने त्या पाण्याने स्वत: स्नान केले, वज़्ेश्वरीदेबीलाही स्नान घातले ब तिची पूजा केली. तेव्हा देवी स्वत: प्रगट झाली व त्याला म्हणाली, ''मच्यछिंद्रा, तू मला स्वत: निर्माण केलेल्या उष्ण कुंडातील पाण्याने स्नान घातलेस, त्यामुळे मी तुजवर प्रसन्न आहे. तू येथे एक महिनाभर तरी राहा.'” .मग नाथ तेथे राहिला. त्याने देवीला विचारले, “माते तुझी वज़्रभगवती, बज्राबाई, वज्रेश्वरी अशी नावे का पडली ?'' देवी म्हणाली, “पुर्वी बसिष्ठांच्या यज्ञात
इंद्र देवसैन्यासह आला, तेव्हा बसलेल्या क्रषींनी त्याला उत्थापन देऊन आदर प्रस्थापित केला नाही, म्हणून तो रागावला व त्याने त्यांच्यावर वज़् फेकले. पण दशरथी रामाने शक्तिमंत्राचा जप करून दर्भरूपी बाण त्या वज्रावर मारला. त्यावेळी मी दर्भातून प्रगट झाले ब ते वज गिळून टाकले. तेव्हा इंद्र रामाला शरण गेला ब आपले वज त्याने परत मागितले. रामाने वज परत दिले. माझी इथे स्थापना केली. रामाने या भोगावती नदीच्या पाण्याने मला स्नान घातले व माझी प्रतिष्ठापना.केली आणि माझे नाव वज्रावती ठेवले.'” पुढे एक महिना संपला, तेव्हा मच्छिंद्रनाथ देवीचा निरोप घेऊन उत्तर भारतात निघाला.
अध्याय फलश्रुती:- ८४ लाख योनीतील जन्म येणार नाही, व्यथा ,चिंता संपेल.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.