Subscribe Us

sankshipt shri gurucharitra adhyay 2 || संक्षिप्त श्रीगुरुचरित्र अध्याय २

 संक्षिप्त श्रीगुरुचरित्र

 अध्याय २ रा 

फलश्रुती:- सद्गुरुप्राप्ती होईल आणि गुरुभक्ती दृढ होईल.



 येवोनी योगेश्वर जवळी । भस्म लाविले कपाळी आश्वासून तये वेळी अभयकर देतसे ||१||

सिद्ध म्हणे आपण योगी । हिंडो तीर्थे भूमिस्वर्गी प्रसिद्ध आमुचा गुरु जगी । नृसिंह सरस्वतीविख्याता ||२|| 

गुरुकृपा होय ज्यासी । दैन्य दिसे कैचे त्यासी समस्त देव त्याचे वंशी कळिकाळासी जिंके नर ||३|| 

एखादे समयी श्रीहरि अथवा कोपे त्रिपुरारी। रक्षील श्रीगुरू निर्धारी । आपुले भक्तजनासी ||४|| 

गुरु केबी झाले त्रिमूर्ती ते कोपलिया न रक्षी कोणी हा बोल असे कवणाचा ||५||

 सृष्टी रचावयाचा विचार असे वेदात सविस्तर । रचि गा ब्रह्मया अहर्निशी । म्हणोनि सांगे हृषीकेशी ||६|| 

कृत प्रेत द्वापार युग । उपजवि मग कलियुग । कलियुगाते पाचारून म्हणे जावे पृथ्वीवरी ||७|| 

कलियुग म्हणे ब्रह्मयासी | जिंकीन समस्त लोकांसी। लिंग जिव्हा रक्षणारासी हारी असे आपणाते ||८|| 

कलि म्हणे ब्रह्मयासी । उच्छेद करीन धमाँसी परद्रव्यहारक, परस्त्रीरत हे दोघे माझे भ्रात ||९|| 

कलियुगी आयुष्य अल्प जे करीती तपअनुष्ठान शीघ्र पावती परमार्थ तेची माझी वैरी असती ||१०|| 

म्हणून नका धाडू भूमीवरी जिथे माझे वैरी असती । पुण्यवान लोक ||११|| 

ऐकून कलीचे वचन ब्रह्मा सांगतसे आपण । जे जन भजती हरिहरांसी। गुरुसेविती निरंतरेसी । त्यांसी तुझा न लागे दोष ||१२|| 

कली म्हणे ब्रह्मयासी । गुरुमहिमा आहे कैसी। विस्तारावे मजप्रती गुरुस्वरूपे कैसी ||१३|| 

(श्लोक) गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः । गुरुरेव परब्रह्म । तस्मात् गुरु मुपाश्रयेत ।) इतुके ऐकोनी कली आपण विनवीतसे कर जोडून गुरू सर्व देवांसमान | केवी झाला सांग मज || १४ || 

गुरु सेविता सर्व सिद्धी । होती परियेसा त्रिशुद्धी । गोदावरीतीरावर वेदधर्मा गुरुचा आश्रम ||१५|| 

तो आपल्या पातकांचा करण्या नाश। दिपक शिष्यासह आला काशीत अंध पंगु, गलत्कुष्ठी । गुरु झाला महाकष्टी ||१६||

 सुहास्य मुखे सेवा करी। गुरु शिव्या सहन करी । न धरीते अंतरी । क्षाळण करी मलमूत्र ||१७|| 

शिष्या गांजी सेवेसाठी तरी करी सेवा शिष्य । शिवशंकर झाले प्रसन्न । दिपका देई वरदान ||१८|| 

नाही गुर्वाज्ञा म्हणून फिरवून धाडी शंकर । त्याचा निश्चय पाहून वर दे विष्णुही येऊन || १९|| 

शिष्य बोले सर्व दान देईल माझगुरू पूर्ण निश्चय त्याचा ओळखून। गुरुभक्ती व्हावी वर दिधला ||२०|| 

तुझे वाक्य सर्वसिद्धी । तुझे घरी नवनिधी । विश्वनाथ तुझे स्वाधी । म्हणे गुरु संतोषोनि ||२१|| 

जे सेविती माता-पिता आपले गुरू भजता । स्त्रियां सेविती आपुले पति। तेही होती गुरुसेवक ||२२|| 

इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ । श्रीनृसिंहसरस्वती उपाख्याने । सिद्धनामधारक संवादे शिष्यदीपकाख्यानं नाम द्वितीयोऽध्यायः ||२||

sankshipt gurucharitra adhyay 2, sankshitpt shrigurucharita, sankshitpt gurucharitra, संक्षिप्त श्रीगुरुचरित्र अध्याय २, gurucharitra parayan, gurucharitra kathasar in marathi, guru charitra parayan, how to read sankhipta gurucharitra, gurucharitra granth, shree guru charitra in marathi adhyay 2, gurucharitra in marathi, parayan, sampoorna gurucharitra adhyay, gurucharitra adhyay 2 in marathi, gurudev datta, shri gurucharitra, krushnarekha, कृष्णरेखा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या