Subscribe Us

आज किती सांगू ग सांगू ग आनंद माझ्या मनी | आई अंबाबाई | aai ambabai

 आई अंबाबाई

आज किती सांगू ग सांगू ग आनंद माझ्या मनी 

शब्द कसे आणू ग आणू ग आणू ग माझ्या ओठी

किती किती सांगू ग सांगू ग आनंद मावेना पोटी 

आज घरी आली ग आली ग अंबाबाई

आज घरी आली ग आली ग अंबाबाई


तिने होती नेसली ग नेसली ग पैठणी जर्द पिवळी 

तिने होती माळीली ग माळीली ग चाफ्याची वेणी 

होते घातले ग घातले ग दागदागिने ठाई ठाई 

पायी मंजुळ ग पैंजण वाजले दारी 

आणि घरी आली ग आली ग अंबाबाई 

आणि घरी आली ग आली ग अंबाबाई


ती बैसली ग बैसली ग चौरंगावरी बाई 

रूप तिचे पाहून ग पाहून ग मी भान हरपले बाई 

तीची रूपेग रूपेग स्त्रीजातीची शक्ती 

तिने ठेविला ग ठेविला ग हात माझ्या डोईवरी

तिच्या बांगड्याच्या आवाजाने मी भानावर आले बाई

आणि घरी आली ग आली ग अंबाबाई 

आणि घरी आली ग आली ग अंबाबाई


श्रीमती श्रद्धा कुलकर्णी 

{सांगली}

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या