Subscribe Us

sankshipt shri gurucharitra adhyay 4 || संक्षिप्त श्रीगुरुचरित्र अध्याय ४

संक्षिप्त श्रीगुरुचरित्र

 अध्याय ४ था 

फलश्रुती:- विवेक, धैर्यादी सद्गुण वाढतील. दतात्रेयांची कृपा होईल. 


।।  श्रीगणेशय नमः ।। 

ऐसे झाले दहा अवतार । अनसुया अत्रिऋषीची भाज । पतिव्रता शिरोमणी खास । तिचे हरावया सत्त्व । त्रैमूर्ति आले धरोनिया कपटवेष आणि पुत्र झाले तियेचेच ||१|| 

मरीची अत्रि अंगिरस । पुलस्त्य पुलह ऋतु वसिष्ठ । सृष्टीकर्ता ब्रह्मा जाण । सातजण ब्रह्मपुत्र || २ || 

अत्री ऋषीची भार्या । नाव तिचे अनसूया । पतिव्रता शिरोमणिया । जगदंबा तेचि जाणा ||३|| 

तिचे  सौंदर्यलक्षण जिचा पुत्र चंद्र आपण । पतिसेवा करी बहुत स्वर्गेश्वर्य घेईल म्हणोन । देव झाले भयाभीत ||४|| 

त्रैमूर्ति म्हणती आम्हांला वाढ सति । वस्त्र सोडून आयुति अथवा जाऊ दुसरे द्वारी। भूख क्षमवावया ||५|| 

ओळखून देवांचे कपट । अनसूया स्मरे पतिचरण । म्हणे अतिथी माझी बाळे । घेऊन आली भोजनपात्रे ||६|| 

माझे मन असे निर्मळ काय करील मन्मथ खळ पतीचे असे तपफळ | तारील मज म्हणतसे ||७|| 

नग्न होवोनिती देखा । घेवोनि आली अन्नोदका । तंव ते झाले बाळका । त्या जागी लोळती ||८|| 

बाळ देखोनि अनसूया । भयचकित होवोनियां । पुनरपि वस्त्रे नेसोनिया । आली बाळकांजवळी ||९|| 

रुदन करती तिन्ही बाळ । क्षुधार्त झाली केवळ स्तनपान करावी अतिहर्षी । एकएकाची क्षुधा करी निवारण || १०|| 

पर्यंदे गाथ नानापरी । मध्यान्हवेळ अतिथीकाळी । अत्रि आले आश्रमासी । सर्व काही समजले || ११|| 

अनसूया म्हणे अत्रिसी । प्राणेश्वर तूचि होसी । देव पातले तुमच्या भक्तीसी । पुत्र मागा तुम्ही आता || १२ || 

तिघे बालक माझे घरी रहावे माझ्या पुत्रांपरी । हेचि मागतो निर्धारी । त्रैमूर्ति आपण एकरूप ||१३|| 

ब्रह्ममूर्ति चंद्र झाला विष्णुमूर्ति दत्त केवळा ईश्वर दुर्वास झाला । तिघे पुत्र अनसूयेचे ||१४|| 

आता ऐका श्रीदत्तात्रेयांचे पुढील अवतार त्यांचे ऐकता होय मनोहर। सकळाभीष्टे साधती ||१५||

 इति श्रीगुरुचरित्र अनसूयोपाख्यान नाम चतुर्थाध्यायः || ४ ||

sankshipt gurucharitra adhyay 4, sankshitpt shrigurucharita, sankshitpt gurucharitra, संक्षिप्त श्रीगुरुचरित्र अध्याय ४, gurucharitra parayan, gurucharitra kathasar in marathi, guru charitra parayan, how to read sankhipta gurucharitra, gurucharitra granth, shree guru charitra in marathi adhyay 4, gurucharitra in marathi, parayan, sampoorna gurucharitra adhyay, gurucharitra adhyay 4 in marathi, gurudev datta, shri gurucharitra, krushnarekha, कृष्णरेखा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या