Subscribe Us

sankshipt shri gurucharitra adhyay 5 || संक्षिप्त श्रीगुरुचरित्र अध्याय ५

 संक्षिप्त श्रीगुरुचरित्र

 अध्याय ५ वा 

फलश्रुती:- अतिथी संतुष्ट होतील. संतती पराक्रमी होईल.


 ।। श्रीगणेशाय नमः ।।

भक्तजनतारणार्थ अवतार धरी श्रीगुरुनाथ । सगराकारणे भगीरथ । आणि गंगा भूमंडळी ||१|| 

पीठापूर पूर्वदेशी होता ब्राह्मण उत्तमवंशी नाम आपळराजा भार्या सुमता पतिव्रता || २ ||

 वर्तता ऐसे एके दिवशी आला दस अतिथीवेषी श्राद्ध होते अमावस्सी विना घरी ते दिवशी || ३ ||

 न जेविता ब्राह्मण घरी दत्ता भिक्षा घाली ते नारी । दत्तात्रेय साक्षात्कारी । प्रसन्न झाला तये वेळ ||४ ||

त्रयमूर्तिचे रूप घेऊनी । स्वरूप दावियले अतिगहनी । पतिव्रता धावोनि चरणी । करी नमस्कार ||५|| 

दत्तात्रेय म्हणे तिजसी माग माते जे इच्छिसी । ब्रीद माझे चराचरी । चौदा भुवनांमाझारी ||६|| 

तव बोलली पतिव्रता । स्वामी जे निरोपिले आता। जननी नाम मज ठेविता । करा निर्धार याच बोला ||७|| 

हावा पुत्र मज ऐसा ज्ञानवंत पुराणपुरुषां जगद्वं वेदसदृशा तुम्हां सारिखा हे देवा ||८|| 

तापसी म्हणे तियेसी पुत्र होईल तुज परिवेसी उद्धरील तुझे वंशाली ख्यातिवंत कलियुगी  || ९ ||

असावे तुम्ही त्याचे बोली येही न राहे तुम्ही ज्ञानमार्गी तुमचे दैन्य ही ||१०|| 

धन्य तुझी मातापिता । जो वर लाधलीस आता । पुत्र होईल दत्तात्रय जैसा । न धरी चिंता म्हणे पती || ११ ||

 ऐसे नवमास क्रमोनी | प्रसूत जाहली शुभदिनी मिळूनि समस्त विप्रकुळी । जातक वर्तविती तये वेळी ||१२|| 

म्हणती तपस्वी होईल बळी । दीक्षाकर्ता जगद्गुरू । आम्हां वरदिधला दत्ता । म्हणोनि ठेविती तया नाव || १३|| 

श्रीपाद म्हणोनिया कारण । नाम ठेवीतो ब्राह्मण । त्रैमूर्तींचा अवतार । भक्तजनां तारावया || १४ || 

सात वर्षे होता पुरी । मौंजीबंधन ते अवसरी । करिता झाला द्विजोत्तम । ते अवसरी ||१५||

 बांधिता मौजी ब्रह्मचारी । म्हणता झाला वेद चारी । मीमांसा तर्क अतिविस्तारी । म्हणो लागला तये वेळी ||१६|| 

बर्तता ऐसे तयासी झाली वर्षे षोडशी विवाह करू म्हणती वासी मातापिता अवधारा ||१७||  

जरी कराल माझा विवाह । ऐका विचार माझा तुम्ही ।। वैराग्य स्त्रीसंगे असेन मी । काम्य आमुचे तिथे जवळी || १८ ||

त्या स्त्रियेवाचूनि आणिक नारो। समस्त जाणा मातेसरी । जरी आणाल ते सुंदरी । वरीन म्हणे तये वेळी ||१९|| 

श्रीपाद श्रीवल्लभ नाम ऐसे झाले त्रिमूर्ति कैसे पितयाते म्हणतसे जाऊ उत्तरपंथासी ||२०|| 

ऐकोन पुत्राचे वचन | आठवले पूर्वसूचन। भिक्षुके सांगितली जे खूण । सत्य झाली म्हणतसे || २१ ||

न म्हणावे पुत्र यासी । अवतार पुरुष तापसी। जैसे याचे वसे मानसी । तैसे करावे म्हणती दोघे. ||२२||

 माता पिता म्हणती श्रीपादा। अश्रुपात निघती डोळा। मनी असे व्याकुळीता । प्रतिपालीसी आम्हां दोघा | म्हातारपणी ||२३||

 देखोनी मातेचे दुःख । श्रीपाद पुसे अश्रुपातान करी चिंता आहो माते । जे मागसी ते देईन तूते ||२४||

 माता सांगे मनीची इच्छा । वृद्धापकाळी रक्षिसी आम्हां । पुत्र असती अपणा दोन पाय पांगुळ अक्षहीन ||२५||

 ऐकोन जननीचे वचन अवलोकी अमृतवृष्टी करून पुत्र झाले दोघे सगुण आली दृष्टीचरणादिक ||२६|| 

आश्वासन तया वेळी । दिधला वर तात्काळी । पुत्रपौत्री नांदा प्रबळी । श्रीयायुक्त सनातन ||२७|| 

पुत्र दोघे शतायुषी निषय घरी यो मानसी कन्या पुत्र होतील यांसी तुम्ही नेत्री देखाल ||२८|| 

सांगोनि ऐसे मातापित्यासी । अदृश्य झाले परियेसी । पावले त्वरित पुरी काशी । गुप्तरूपे होते तेथे ||२९||

 निघाले तेथून बदरीवना । भेटी घेऊन नारायणा । अवतार असे आपणा । कार्याकारण मनुष्यदेही ||३०||

 दीक्षा द्यावया भक्तजना । तीर्थे हिंडणे आपणा । मनोवेगे मार्गक्रमणा। आले तीर्थ गोकर्णासी ||३१|| 

इति श्रीगुरुचरित्र दत्तात्रेयावतारकथनं नाम पंचमोध्यायः ||५ ||

sankshipt gurucharitra adhyay 5, sankshitpt shrigurucharita, sankshitpt gurucharitra, संक्षिप्त श्रीगुरुचरित्र अध्याय ५, gurucharitra parayan, gurucharitra kathasar in marathi, guru charitra parayan, how to read sankhipta gurucharitra, gurucharitra granth, shree guru charitra in marathi adhyay 5, gurucharitra in marathi, parayan, sampoorna gurucharitra adhyay, gurucharitra adhyay 5 in marathi, gurudev datta, shri gurucharitra, krushnarekha, कृष्णरेखा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या