Subscribe Us

sankshipt shri gurucharitra adhyay 6 || संक्षिप्त श्रीगुरुचरित्र अध्याय ६

 संक्षिप्त श्रीगुरुचरित्र

 अध्याय ६ वा 

फलश्रुती:-  कठीण प्रसंगात योग्य मार्गदर्शन प्राप्त होईल.


 ॥ श्रीगणेशाय नमः ॥ 

नामधारक म्हणे सिद्धासी तीर्थे करावी किंकारण । विशेष असे काय गोकर्ण । म्हणोनि गेले तया स्थाना ||१||

दत्तात्रेय आपण । भक्तजनहितार्थ दीक्षेस्तव । गोकर्णी शंकर असे जाण । त्रैमूर्ति असती तया ठायी ||२|| 

महाबळेश्वर लिंग। स्वयंभू शिव । त्याचे आख्यान। लंबोदरे प्रतिष्टिले ||३|| 

पुलस्त्य ब्राह्मणाची भार्या। कैलासपदास्तव कैकया। सर्वकाळ शिवपूजा रावणे ते देखिले ||४|| 

एक दिन होती पूजित । मृत्तिकेचे शिवलिंग। रावण म्हणे मातेसी । कैलास आणून तुजपाशी देईन हे निश्चयेसी ||५|| 

पावला रावण कैलासासी शुभ्र रम्य पर्वतासी धरोनि हालवी क्रोधेसी। वीस बाहु भुजाबळे ||६|| 

कैलासा चे देवगण । भयभीत गिरिजा आपण शिवास पुसती सर्व जण कैसा कैलास आंदोळतसे ||७|| 

म्हणोनि कैलासा चेपी हर । त्याने जाऊ लागले प्राण मरणोन्मुख करी स्तोत्र । तूचि प्राणदाता सोडवी मज ||८|| 

सुटता तेथून लंकेश्वर स्तोत्र करे सप्तस्वर । स्वशिर छेदोनि निजमंत्र विणा वादन । सामवेद गातसे ||९|| 

रावणाचे भक्तीसी । प्रसन्न शिव त्वरितेसी । निजरूप घेउनी । उभा राहिला सन्मुख ||१०|| 

आत्मलिंग देऊन त्यासी । म्हणे होसी शंभू तूचि । ये तुला अमरता । पूजिता, वर्षे तीन ||११|| 

अवनीवरी नेता घरी ठेविता न ये करी येणेपरी नेई घरी काय करिसी कैलासा ||१२|| 

ऐसा वर लाधेन। लंकापुरा निघे रावण त्वरे नारद जाऊन । करी इंद्रा सर्व कथन ||१३|| 

रावणाचे पाहून कपट । शंकराचा भोळेपण । ब्रह्म विष्णू शिवापाशी जाऊन वदती का असे केले ||१४|| 

कधी दिले लिंग त्यासी । पाच घटी झाल्या त्यासी उपाय करी नारायण धाडुनि सुदर्शन चक्र ||१५|| 

बोलावून नारदासी। सांगे जावे त्वरितेसी मार्गी जाऊन तयासी जाऊ न द्यावे लंकेसी ||१६|| 

चक्र झाले सूर्याआड स्नान संध्या करील रावण गणेशासी सांगे भगवान । व्रतभंग करावा रावणाशी || १७|| 

संध्यासमयी रावण पाहुनि ब्रह्म चारी बालका। दे त्याच्या हाती आत्मलिंग म्हणे धरी मी येईस्तव ||१८|| 

बालकाने धरिले आत्मलिंग म्हणे जड होता हाक तीन मारीन वेळ लागलिया परियेसी । आपण ठेवीन भूमीवरी || १९|| 

अर्घ्य देत होता रावण बालक म्हणे यावे त्वरित । जड झाले आत्मलिंग तीन वेळा तो नये । म्हणोनि ठेवी भूमीवरी ||२०|| 

गणेशाने केले आत्मलिंग स्थापन। रावणा न हाले म्हणून झाले महाबळी गोकर्णासम। म्हणोनि गोकर्ण महाबळेश्वर आत्मलिंग ||२१||

 इति श्रीगुरुचरित्र गोकर्णमहिमा वर्णन नाम षष्ठोऽध्याय ||६|| 

sankshipt gurucharitra adhyay 6, sankshitpt shrigurucharita, sankshitpt gurucharitra, संक्षिप्त श्रीगुरुचरित्र अध्याय ६, gurucharitra parayan, gurucharitra kathasar in marathi, guru charitra parayan, how to read sankhipta gurucharitra, gurucharitra granth, shree guru charitra in marathi adhyay 6, gurucharitra in marathi, parayan, sampoorna gurucharitra adhyay, gurucharitra adhyay 6 in marathi, gurudev datta, shri gurucharitra, krushnarekha, कृष्णरेखा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या