Subscribe Us

sankshipt shri gurucharitra adhyay 7 || संक्षिप्त श्रीगुरुचरित्र अध्याय ७

 संक्षिप्त श्रीगुरुचरित्र

 अध्याय ७ वा 

फलश्रुती:-  महापातकांचे निरसन होईल. गोकर्ण यात्रेचे पुण्य मिळेल. 


|| श्रीगणेशय नमः ||

पूर्वी इक्ष्वाकुवंशी मित्रसह राजा । क्षत्रियवंशी । होता सर्वधर्मरत ||१|| 

एक दिवशी निघाला पारधेशी निर्मनुष्य अरण्यात वाघ-सिंह हिंस्र ||२|| 

भेटला दैत्य ज्वाळाकार । त्यासी मारी राजा ठार । आक्रंदे त्याचा बंधू बंधूसी म्हणतसे घ्यावा सूड ||३|| 

राजयाचा सक्षम श्रीगुरुवरित्र झाला सेवक । धरोनि मानवाचे रूप नरमांस वाढले ऋषींस । श्राद्धदिनी वसिष्ठादिकां ||४|| 

वसिष्ठ म्हणे राजासी । या पापास्तव होसी ब्रह्मराक्षस म्हणे बारा वर्षांनी पुनरपि राजा होशील ||५|| 

वनात भेटे ब्राह्मणदांपत्य । त्याने धरिले ब्राह्मणासी घेऊन गेला भक्षावयासी । ब्राह्मणी म्हणे राखे मजला अहेवपणे || ६ || 

बोल न मानोनि राक्षसे । त्या ब्राह्मणाते भक्षिले ।। शाप वदली ते ब्राह्मणी । रमता स्त्रियेसह प्राण तुझा जाई ||७|| 

बार वर्षे क्रमून । पुनरपि राजा होऊन आला आपुले नगरासी स्त्रियेसी सांगे शापवचन ||८||

ब्रह्महत्याती न जाय । भूपा वाटे त्याने भय । मिथिलापुरी भेटे गौतम ||९|| 

मुनी तया आश्वासून । सांगे क्षेत्र गोकर्ण । तेथे दोष निवारून तू पावन होशील || १० || 

गौतम मुनीने सांगितले रायासी । आख्यान एका चांडाळीचे । जनसंयोगेसी आली गोकर्णक्षेत्रासी । शिवरात्री होती त्या दिवशी ||११|| 

होती चांडाळी वस्त्रहिन । व्रत दिवशी मागे अन्न हाती होते बिल्वपत्र ते फेकिले शिवावरी ||१२|| 

दैवयोगाने पडले लिंगावर । त्याने तुष्टे गौरीहर करण्या इसे भवपार धाडीले आपुले शिवदूत ||१३|| 

पुनर्जन्मले ही । म्हणोनिया नेली त्याही गौतम म्हणे नृपा तूही पाही गोकर्ण क्षेत्रास ||१४|| 

इति श्रीगुरुचरित्र गोकर्णमहिमावर्णनं नाम सप्तमोऽध्याय ||७||

sankshipt gurucharitra adhyay 7, sankshitpt shrigurucharita, sankshitpt gurucharitra, संक्षिप्त श्रीगुरुचरित्र अध्याय ७, gurucharitra parayan, gurucharitra kathasar in marathi, guru charitra parayan, how to read sankhipta gurucharitra, gurucharitra granth, shree guru charitra in marathi adhyay 7, gurucharitra in marathi, parayan, sampoorna gurucharitra adhyay, gurucharitra adhyay 7 in marathi, gurudev datta, shri gurucharitra, krushnarekha, कृष्णरेखा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या