Subscribe Us

संक्षिप्त श्रीगुरुचरित्र अध्याय ८ || sankshipt shri gurucharitra adhyay 8

 संक्षिप्त श्रीगुरुचरित्र

 अध्याय ८ वा 

फलश्रुती:-  संतती विद्वान होईल. शनिप्रदोष व्रताचे पुण्य मिळेल. 



।। श्रीगणेशाय नमः ।। 

गोकर्णक्षेत्री श्रीपाद यती । राहिले वर्षे तीन गुप्ती । तेथोनि श्रीगिरिपर्वता येती लोकानुग्रहाकारणे ||१|| 

श्रीपाद राहिले कुरवपुरी । ख्याति राहिली भूमीवरी जे जन भजती भक्तीसी । सौख्य पावती अप्रवासी ||२|| 

अवतार व्हावयाचे कारण वेदशास्त्रसंपन्न ब्राह्मण । त्याची भार्या अंबिका । तियेसी पुत्र होऊनि मस्ती || ३|| 

ऐसे असता होणार गती । पुत्र जाहला मंदमती । विप्रात्मज वाढला व्रतबंधा परी । विद्या न ये तया कुमरा ||४|| 

अनेक प्रकारे शिकवी त्यासी । ताडण करी बहुवसी। होतसे दुःख बहुवसी । वर्जी आपुले पतीते ||५|| 

दैव वशे करुनि । पंचत्त्व पावला तो विप्र । याचूनि आपुले उदर भरी । येणे परी जीवित्व रक्षी ||६|| 

विवाह योग्य झालासी पर । लाज कैसी तुज न वाटे । काय व्यर्थ पशूचिये परी । का न करिसी गंगाप्रवेश ||७|| 

निंदा करिती सर्वही मज । असोनि देह कवण काज । पोसू न शके माते तुज । प्राण त्यागीन मी आता ||८|| 

माता सुत दुःख करीत । गेली गंगाप्रवाहात तेथे देखिले जगदुद्धरित । श्रीपाद योगी स्नान करत || ९ || 

जाऊनि दोघे लागती चरणी । विनविताती कर जोडूनी वासना अमुचे मनी । प्राण त्यजावा गंगेत ||१०|| 

ऐकोनि विप्रसतीचे वचन | काय संकटी तुमचे मन । त्यजिता प्राण काय निमित्त । विप्रस्त्री सांगे तयेवेळी || ११ || 

व्रते उपवास सांगू किती । करिते झाले अपरमिती । झाला पुत्र हा दुर्गती । निंदा करिती सकळ जन ||१२|| 

कृपासागर दैन्य हरण । म्हणोनि धरिले तुझे चरण । शरणागताचे करावया रक्षण आलासी आजि कृपासिंधु ||१३|| 

देवा आता ऐसे करणे । पुढील जन्मी मनुष्यपणे । पूज्यमान पुत्र पावणे। जैसा पुत्र तू जगतत्रयासी ||१४|| 

सकल लोक ज्यासी वंदिती । ऐसा पुत्र व्हावा म्हणे ती । उपाय सांगा श्रीगुरू यती । म्हणोनि चरणी लागली ||१५|| 

ऐकोनि तियेचे वचन । करी हो ईश्वरी आराधन । पुत्र होईल श्रीहरी ऐसा ||१६|| 

गौळियाचे घरी देखा । कृष्ण उपजला कारणिका । व्रत केले गौळी ऐका । ईश्वराची आराधना ||१७|| 

तैसा तू आराधी ईश्वर पुत्र पावशील हा निर्धार तुझा मनोरथ साचार पावेल सिद्धि श्रीपाद म्हणती ||१८|| 

विप्रत्री म्हणे ते वेळी कैसे व्रत आचरिले गौळी कैसा पूजिला चंद्रमौळी विस्तारावे मजप्रती ||१९|| 

म्हणती श्रीपाद यति तिबेसी ईश्वर पूजी हो प्रदोषी मंदवारी प्रयोदशीसी पूजा करणे भक्तीने ||२०|| 

ऐकोन श्रीगुरूचे वचना । संतोषली विप्रांगना । पुढती घाली लोटांगना तया श्रीपाद श्रीगुरुप्रती || २१ || 

विप्रस्त्री म्हणे स्वामीसी अभिनव माते निरोपिलेसी देखता पूजा प्रदोषी पुत्र झाला कृष्ण जैसा ||२२|| 

श्रीगुरु सांगती तियेसी उज्जनी नाम नगरीसी । राजा चंद्रसेनाचे आख्यानेसी । तये वेळा ||२३|| 

सांगितला सकल वृत्तांत संतोष करिती राजे समस्त । गौळीयांत राजा तू म्हणत देती नाना देश संपदा ||२४|| 

निघोन गेले राजे सकळ । राहिला चंद्रसेन निर्मळ शनि प्रदोष पूजा सफल । भय कैचे तया राजा || २५ || 

गौळी कुमार येऊनि घरा । सांगे माते सविस्तरा । पुढे येईल तुझिये उदरा । नारायण अवतरोनी ||२६|| 

ऐसे ईश्वरे दिधला वर संशय न करी तू निर्धार संतोषला कूर्परगौरा देखिली पूजा तू प्रदोषाची ||२७|| 

मोडिली पूजा म्हणो नि । म्या विनविला शूलपाणी । क्षमा करोनि घेतले म्हणोनि । सांगे वृत्तांत मातेसी ||२८|| 

ऐसे म्हणोनि श्रीपाददेव । बोलावूनि तिचे कुमारासी । हस्त ठेविती मस्तकेसी । त्रिवेदी झाला तो ब्राह्मण ||२९|| 

पुत्र झाला तिचा ज्ञानी । वेदशास्त्रार्थं संपन्नी । विवाह होऊनी पुत्रपौत्री नांदे हषीं । श्रीगुरुकृपा होय त्यासी ||३०|| 

इति श्रीगुरुचरित्री प्रदोषव्रतमहात्म्य कथनं नाम अष्टमोऽध्यायः ||८|| 

sankshipt gurucharitra adhyay 8, sankshitpt shrigurucharita, sankshitpt gurucharitra, संक्षिप्त श्रीगुरुचरित्र अध्याय ८, gurucharitra parayan, gurucharitra kathasar in marathi, guru charitra parayan, how to read sankhipta gurucharitra, gurucharitra granth, shree guru charitra in marathi adhyay 8, gurucharitra in marathi, parayan, sampoorna gurucharitra adhyay, gurucharitra adhyay 8 in marathi, gurudev datta, shri gurucharitra, krushnarekha, कृष्णरेखा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या