Subscribe Us

श्री हरिविजय ग्रंथ अध्याय १ || harivijay granth adhyay 1 || हरिविजय ग्रंथ अध्याय पहिला

 श्री हरिविजय ग्रंथ अध्याय पहिला

 संत्रस्त्र देव विष्णू कडे येतात 

।। श्रीगणेशाय नमः ।।

harivijay granth adhyay 1


harivijay granth adhyay 1

  श्रीहरीला वंदन असो. श्रीपांडुरंग हेच माझे सर्वस्व आहे. पांडुरंगा, गणेश, सरस्वती, गुरू, सिद्धिविनायक, हे सारे देव म्हणजे तूच ! आदिमाये, पांडुरंगा, श्रीहरी तुम्ही सारे एक असून अनेक जगाची उत्पत्ती, स्थिती लय करणारे, सर्वत्र सदा वर्तमान आहात. सर्वव्यापी अशा लक्ष्मीनारायणांना शरण आहे. हरिविजय ग्रंथ लिहिण्यास तुम्हीच प्रेरक संकल्प सिद्धीस नेणारे आहात ! आणि गुरूवाचून आत्मज्ञान नाही आत्मज्ञानाशिवाय मोक्ष नाही. त्या ब्रह्मानंद गुरूंच्या कृपेने त्यांना वारंवार नमन करून हा ग्रंथ मी लिहीत आहे. चालते बोलते ईश्वरच असे संत! त्यानाही मी वंदन करीत आहे. व्यास, वाल्मीकी, वसिष्ठ, शुक, नारद या परम भक्तांना ऋषींना भी वंदन करून हा हरिविजय ग्रंथ शब्दबद्ध करीत आहे.

harivijay granth adhyay 1

        श्रीरामावतार समाप्त होऊन पुष्कळ काळानंतरची कथा आहे. द्वापर युगाचा अंत जवळ आला होता. राक्षस आता क्षत्रिय राजांच्या रूपाने अवतरले होते. महाबलिष्ठ झाले होते. दुष्टबुद्धीचे होते. साधूंना छळीत होते. आपसातही लढाया वारंवार करीत. विष्णूचा वैष्णवांचा तर फारच द्वेष करीत. यज्ञांचा विध्वंस करीत. हजारों राजांना बंदीत टाकणारा जरासंघ तर यज्ञात माणसांचा बळी देई ! नरकासुराने सहस्रावधी कन्या बंदीत ठेवल्या होत्या. कंस, शिशुपाल, दंतवक्र, चाणूर, अघ, बक, केशी हे दैत्यच होते. मायाशक्ती साध्य केलेला शाल्व अजिंक्य होता. सर्वत्र हे लोक माजले होते. प्रजेचे रक्षण, पालन करण्याचे क्षात्र कर्तव्य विसरून राजे प्रजेचे हाल करीत. हे राजे जुगार खेळत, मनसोक्त मद्य पीत, गाई पळवून नेत, प्रजा दरिद्री झालेली होती, कारण राजे त्यांचे हस्तकच मुळी प्रजांना लुटीत ! बाणासुर, कालयवन, दुर्योधनादि कौरव, यांच्यासारख्यांचा अनाचार वाढत होता. देवांची ब्राह्मणांची छळणूक होत होती. या पापामुळे पृथ्वी त्रस्त झाली. गाईचे रूप घेऊन हंबरूं लागली. ऋषीमुनींनी त्याला साकडे घातले. इंद्रही तिथे आला. त्यानी ठरविले की आपण सर्वानी विष्णूला शरण जावे. त्यानेच दुष्टांचे शासन साधूंचे रक्षण करावे. आपले बळ कमी पडते. आपला इलाज चालत नाही.

        सारे देव, ऋषी, ब्रह्मा, इंद्र आणि गोरूपाने पृथ्वी क्षीरसागरी विष्णूकडे गेली! विष्णूला सारे शरण गेले. विष्णूचे त्यानी दर्शन घेतले. त्याची स्तुती केली! त्याचे वर्णन दुसऱ्या अध्यायात श्रवण करावे

अध्याय समाप्त

।। श्रीकृष्णार्पणमस्तु ।।

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या