शिव भक्त चांगुणा आणि बाळ चिलिया कथा
shiv bhakt changuna |
बाळ चिलिया माता चांगुणा श्रियाल राजा शोभला शोभला त्या मातेने सत्वासाठी बाळ अपुला कांडला त्या आईने सत्वासाठी बाळ अपुला कापला || ध्रु ||
एके दिवशी महादेव आले सत्व पाहाण्याला चिलीयाचे ते भोजन मागू लागले राजाला एक वार त्या तलवारीने बाळ कसा तो कापला || १ ||
पाक शिजवून तयार केले पान मांडले तिघांना अंतरी त्यांनी देव जाणीला शिर ठेविले शिंक्याला शिर खंठण भोजन महादेव मागू लागला || २ ||
उखळामध्ये बाळ घेतले कांडण आई करी त्याला देवाचाही धावा करिता धारा लागल्या डोळ्यांला बाळ चिलीया केव्हा येशी कोठे रे तू झोपला || ३ ||
शिर शिजवून तयार केले पान मांडीले तिघांना महादेवाशी बोलावून तिघे बैसले भोजनाला निपुनिकाचे भोजन म्हणून महादेव नाही जेवला || ४ ||
आनंदाने बहु प्रेमाने हाक मारीली बाळाला मातेची ती हाक ऐकूनी बाळ धावूनिया आला पंचपक्वान्ने भोजन केले महादेव कैसा पावला त्या मातेने सत्वासाठी बाळ अपुला कांडला || ५ ||
Tags:-
bhakt changuna katha,
चांगुणाची कथा,
भक्त चांगुणाची कथा,
bhakt changuna marathi,
Bhakti changuna chi Katha,
बाळ चिलिया आणि चांगुणा कथा,
shiv bhakt rani changuna,
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.