श्री नवनाथ भक्तिसार
अध्याय :- ४ (मराठी भाषांतर )
हिंगळादेवीच्या दर्शनासाठी मच्छिंद्र निघाला. वाटेत घनदाट अरण्य लागले. तेथे झाडीमागेच एक शेकडो 'हात रूंद ब उंच असे प्रवेशद्वार दिसले. त्या द्वाराचे रक्षण करणारे आठ भैरव होते. त्यांनी मच्छिंद्राची परीक्षा बघावी. म्हणून, त्यांच्यासमोर एकदम गोसाव्याच्या वेषात प्रगट होऊन त्याला विचारले, “ काय रे ब्रम्हचाऱ्या, कोठे जात आहेस?'' तो म्हणाला,'' मी हिंगला देवीचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे. तुम्ही पण येता का?" तेव्हा ते म्हणाले, “अरे आम्हीच या देवीचे द्वारपाल आहोत. येथे येणाऱ्याला त्याच्या 'पापपुण्याचा झाडा द्यावा लागतो. तुझे पापपुण्य सांग नि आत जा.” त्यावर मच्छिंद्रनाथ म्हणाला, ' मी पाप व पुण्य हा भेदच जाणीत नाही. सर्वच कर्मे मी ईशवरार्पण केली आहेत. आता कुठले पाप नि कुठले पुण्य! चला, मला जाऊ द्या!" ते भैरव रागावले व बोलले, ' अरे, देह आहे तोवर देहाचे प्रारब्धकर्म कोणाला सुटले आहे का? जोवर देह-प्रार्ध आहे, तोवर काहीतरी पाप-पुण्य होणारच, आणि कपटाने तू खोटे बोलतोस, तर तुला शक्तीचे दर्शन होणार नाही.'' मच्छिंद्रनाथ पत म्हणाला, “ प्रत्यक्ष यम व शंकरही ज्या ब्राह्मी स्थितीपुढे निष्प्रभ ठरतात, त्या स्थितीत मी आहे, तिथे तुम्हां क्षुद्रांच्या दमदाटीला कोण भितो ? ”
त्याचे हे बोलणे ऐकुन, आठही भैरव नाना प्रकारची शस्त्रास्रे घेऊन त्याच्यावर धावून गेले, पण मच्छिंद्रनाथाने चिमुटभर भस्म घेतले व सर्व देवतांना संरक्षणासाठी आवाहन करून, ते भस्म वजपंजर मंत्र म्हणून आपल्या भाळी लावले. तत्क्षणी मच्छिंद्रनाथ वज़ासारखा कठीण झाला आणि त्या भैरवांना म्हणाला, ''या युध्द करायला, या! तुमचा काय पराक्रम आहे तो 'दाखवा!! नाहीतर कोरड्या विहीरीत जीव द्या.'' भैरवांनी आयुधे सरसावली आणि त्याच्यावर भयंकर मारा केला. पण सर्व शस्त्रे बोथट होऊन परत गेली, मच्छिंद्रनाथ जसाच्या तसा उभा. मग बायु, मोहिनी, इंद्र, नाग, ब्रह्मा, रूद्र, दानव, कृतांत इत्यादी देवता ज्यावर आहेत, अशी भयंकर अस्त्रे भैरवांनी त्याच्यावर फेकली. तेव्हा प्रलय होणार की काय असे वाटू लागले, पण मच्छिंद्राने भस्म मंत्रुन प्रत्येक अस्त्रावर प्रतिअस्त्र योजुन भैरबांचे सर्व अस्त्रवल विफल करून टाकले. त्याचबरोबर वाताकर्षण मंत्र म्हणून भस्म फेकले, तेव्हा सर्व भैरव भुमीवर पडले. त्यांचे प्राण कासाविस झाले व ते निशचेष्ट पडले.
तिकडे हिंगळादेबीने म्हणजेच अंबेने आपल्या मुख्य पाच सात मातृकांना युध्दाची वार्ता समजूनं घेण्यासाठी पाठवले. .त्या परत गेल्या व त्यांनी देवीला युध्दाचे वृत्त सांगितले. तेव्हा देवीने सर्व मातृगणांना मच्छिंद्राला मोह पाडण्यासाठी पाठविले. त्यांचा समुदाय अरण्यातून येत आहे असे पाहताच मच्छिंद्राने विलक्षण तऱ्हेने कामशर योजून मोहनास्त्राचा प्रयोग केला. त्यामुळे त्या सर्व दासींना स्वत:ची स्मृतीच न राहुन त्या वेड्यासारखे नाना प्रकार करू लागल्या. त्या नाचत, ओरडत, हातवारे करीत, गाणी गाऊ लागल्या. मग त्यांच्यावर मच्छिंद्राने विद्यागौरव अस्त्राचा उपयोग केला आणि वातास्त्र सोडून त्या मातृकागणांची वस्त्रे त्यांच्या शरीरावरून सुटतील ब दूर उडून जातील, असे केले. त्याप्रमाणे त्यांची वरत्र उडून गेली व त्या वस्त्रहीन अवस्थेतच बेभान होऊन नाचु लागल्या. त्यानंतर मच्छिंद्राने क्रियाशक्तीने त्या प्रत्येकीला संमोर दिसतील असे अनेक सुंदर पुरूष निर्माण केले व त्याच वेळी त्या मातृकांवरील मोहनास्त्र आवरून घेऊन त्यांचे देहभान त्यांना परत प्राप्त करून दिले.
मातृका भानावर आल्या. पहातात तो समोर कितीतरी तरूण सुंदर पुरूष व त्या स्वत:मात्र विवस्त्र त्यामुळे त्या अतिशय याजित; होऊच पुनःसैरावैरा पळत देवीकडे निघाल्या. जाता जाता त्यांनी आठही भैरव निश््चेष्ट पडले होते ते पाहिले. त्या देवीजबळ तशाच नात सांगितले गेल्या. तेव्हा अंबेने विचारले, * हे ग काय? सगळ्यांची वस्त्रे कुठे गेली?” त्यांनी लज्जेने चूर होऊन सर्व काही जसे घंडले होते तसे सां होईल त्या म्हणाल्या, “माते, आमची पुण्याई संपली म्हणूनच ही स्थिती झाली. तू सुध्दा हे स्थान सोड, आता तो गोसावी येईल नि तुला त्रास व एवढे धैर्यशाली व श्रेष्ठ अष्टभेरब तरीही ते त्याच्या समोर निपचित 'पडले आहेत. तो गोसावी साधासुधा दिसत नाही; प्रत्यक्ष सूर्यच आलाय. जसे काही अकरा रूद्र एका ठिकाणी आलेत. तो सर्व पंचमहाभुते सुध्दा ग्रासुन टाकील.'' त्या चाचरत आणि घाबरत असे बोलत होत्या. तेवढ्यात एक ओरडली, ' आला! तो पहा जोगी आला!! त्यासरशी सगळ्या घाबरून ओरडल्या. तेव्हा देवीने प्रथम मायाशक््तीने सर्वांना नवी वस्त्रे दिली व त्यांना धीर देऊन ध्यानदृष्टीने पाहिले.''
“ओ
हो! हा तर उपरिचर वसूचा पुत्र, मच्छिंद्रनाथ! म्हणजे क्रषी कविनारायण. तुम्ही भिऊ नका. चला, आपण त्याला दर्शन देऊ. चला माझ्यापुढे!'' असे ध्यानदृष्टीने त्याला ओळखून जेव्हा अंबा म्हणाली, तेव्हा सर्वज़णी धीर करून पुन्हा निघाल्या. देवीने मच्छिंद्राला दर्शन दिले. तो लगेच तिच्या चरणी नत झाला. देवीने त्याला उचलून मांडीवर घेतले व म्हटले, '* बाळा! फार उत्तम पराक्रम केलास. या भैरवांना आता जागृत कर." तेव्हा मच्छिंद्राने अस्त्र आवरून घेतले. भैरव उठून उभे राहिले व मच्छिंद्रनाथाची स्तूती करून म्हणाले, “ मार्तंडपर्वतावर मिळवलेल्या सिध्दींची परीक्षा घ्यावी म्हणून याला आम्ही अडविले पण त्याने आमचाच पराभव केला." देवीने मच्छिंद्राला म्हटले, ' बाळा! मला तुझे योगसामर्थ्य दाखव ना थोडेसे!" तेव्हा मच्छिंद्रनाथाने विचारले, “काय करून दाखवू?” देवी म्हणाली, '“हा समोरचा पर्वत आकाशात उडव व तरंगत ठेव. मग तो पुन:जागच्या जागी ठेव.'' तेव्हा मच्छिंद्राने वायुअसत्र व नागास्त्र यांचा प्रयोग करून पर्वत उंच उडवला आणि पुन्हा योगबलाने तो पर्वत जागच्या जागी ठेवला. देबी त्याला म्हणाली, “धन्य धन्य! तू वायु व पर्वत यांना मित्र केलेस. त्यांचा परस्पर विरोध असुनही तू त्यांना वश केलेस. मी तुला आणखी दोन अस्त्रे देते." असे म्हणून अंबा म्हणजेच हिंगलादेवी हिने त्याला स्पर्शास्त्र व भिन्नास्त्र अशी दोन अस्त्रे दिली. त्याला तीन दिवस आपल्याजवळ ठेवून घेतले व वरदान देऊन त्याला निरोप दिला. अरण्यातून तो बाहेर पडेपर्यंत अष्टभैरव त्याला निरोप देण्यासाठी आले होते.
अध्याय समाप्त !

0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.