Subscribe Us

श्री नवनाथ भक्तिसार अध्याय १८ (मराठी भाषांतर ) || navnath bhaktisar adhyay 18

  ।। श्री नवनाथ भक्तीसार ।।

 अध्याय :-१८ 

  गोपीचंदाचे अश्वशाळेत भोजन 


॥ श्री गणेशाय नमः ।। श्री सरस्वत्यै नम: ।। श्री गुरूभ्यो नम: || श्री नवनाथ सिद्धांना नमस्कार असो.

         गोपीचंद राज्यत्याग करून निघाला आहे. ही बातमी त्याच्या देशात सगळीकडे पसरली. जो तो राजाला थांबवून घेऊन राहण्याचा आग्रह करीत होता. नाना पकान्ने अर्पण करीत होता, पण त्या विरक्त महापुरूषाने भिक्षाच तेवढी घेतली. कोठेही तो जास्त वेळ थांबला नाही. गौड देश मागे पडला. कौल देश लागला. तेथे पोलपट्टण गाव राजधानीचे होते. तेथील राजा तिलकचंद महाबलाढ्य, पराक्रमी व मोठे सैन्य बाळगून होता. गोपीचंदाची बहीण चंपावती त्याच्या मुलाला दिली होती. तेथेही गोपीचंदाची बातमी आधीच कळली होती. पण तेथे राजा व चंपावतीचे सासरे, सारे लोक गोपीचंदाची निंदाच करू लागले. 

            भावाची निंदा ऐकून चंपावतीला फार दुःख झाले, पण करणार काय! ती मुकाट्याने बोलणी खात होती. गोपीचंद पीतपट्टणात गेला व एका पाणवठ्याजवळ जाऊन बसला. 'जय गुरूदेव!" असे नामस्मरण तो करीत होता. चंपावतीच्या दासी तिकडून जात होत्या. त्यांनी त्याला पाहिले व ओळखले आणि चंपावतीला तसेच तिलकचंदाला व चंपावतीच्या पतीला पण सांगितले. राजाला वाटले, "हा सुनेचा भाऊ गावात भिक्षा सांगेल, तर आपले हसे होईल. आपल्याला तोंड बाहेर काढणे नको होईल." त्याने सेवकांना सांगीतले, "अरे, तुम्ही त्या गौडदेशाच्या भिकारी राजाला पागेत आणून ठेवा. पण त्यापेक्षा चंपावतीच्या स्वतः च्या दासींना पाठवा. त्याच हे काम करतील. " झाले. अशी (आज्ञा देऊन राजा राजसभेत गेला. चंपावतीच्या दासी गोपीचंदाला बोलवायला गेल्या. गोपीचंदाने म्हटले, "आम्ही बेरागी! आमच्या बहिणी सर्वच घरी चंपावती काय वेगळी?" दासी म्हणाल्या, "महाराज, तुमच्या बहिणीचे मन मोडू नका!" मग एकदा स्वतः भेटून चंपावतीचा निरोप घेऊन जावे, असे म्हणून गोपीचंद राजवाडयात गेला. 

                     मग राणीने उत्तमोत्तम अन्नपदार्थ वाढून त्याला भोजन पाठवले. एका तरूण दासीने ते नाट गोपीचंदाला नेऊन दिले व म्हटले, "महाराज, जेवण करा" गोपीचंदाला क्षणभर वाटले, “या सोयऱ्यांनी मला अपमानाने पागेत बसविले आणि दासीने अन्न आणून दिले." पण पुन्हा त्याने विचार केला, "मी तर आता राजा नाही. मी जोगी. मला सारे सारखे, शत्रु-मित्र हा भेद नाही, अन्न हे पूर्ण ब्रह्म. त्यात काहीच दोष नाही." आणि त्याने गुरूस्मरण करून अन्नाचा घास घेतला. दासींनी चंपावतीला हळूच बोलावून गवाक्षातून तो बैरागी भाऊ दाखविला व मग त्या दूर गेल्या. "तो तुमचा भाऊ ना ? राजा ना? मग येथे का ओशाळ्यासारखे खात बसलाय ? त्याला जोगी कुणी हो केलं ? तुम्हाला हा भणंग मिकारी भाऊ पाहून काहीच कसं वाटत नाही?" इत्यादी प्रकाराने हिणवून त्या चंपावतीला प्रश्न विचारू लागल्या. 

                   मग तिच्या नणंदा, जावा याही तिच्यावर तोंडसुख घेऊ लागल्या. ते कटू शब्द ऐकून चंपावतीता भयंकर दुःख वाटते, राग व दुःख यांच्या तिरीमिरीत तिने एकटी असतांना आपल्या पोटात खंजीर खुपसून घेतला. ती धाडकन जमिनीवर पडली. रक्ताचे धारोळे झाले. ती गतप्राण झाली. दाली मग अंत:पुरात गेल्या. पाहातात तो काय, चंपावती तिच्या महालात मरून पडलेली, हातात खंजीर तसाच दासी एकदम किंचाळल्या सगळ्या राजवाड्यात वाऱ्यासारखी बातमी पसरली. सगळे सेवक, दीर, नणंदा व जावा नाना तर्ककुतर्क करू लागल्या. "भावाच्या अपमानाने चंपावतीने जीव दिला" असे कोणी म्हणू लागले. "गोपीचंद आला नी ही सून मेली." म्हणून त्यालाच कोणी अपशकुनी म्हणू लागले, राजवाडचात झालेला कोलाहल घोडशाळेपर्यंत पोहोचला. "चंपावती राणीने बजीर खुपसून जीव दिला. तिचा गोपीचंद नावाचा भाऊ आपले राज्य सोडून मिकाऱ्यासारखा भटकतो, त्याचे तिला फार दुःख झाले." गोपीचंदालाही ही हकीकत समजली. 

                     त्याला फार वाईट वाटले. 'आपण येथे आलो नि चंपावतीच्या  मरणाला कारण झालो, या गोष्टीचा विसर कोणालाच पडणार नाही. हे काही ठीक नाही. अशा विचाराने त्याला चाईट वाटले, इकडे चंपावतीचे प्रेत जाळण्यासाठी लोक स्मशानाकडे नेत होते, गोपीचंदही उठला व त्या लोकांबरोबर गेला. 'नाथपंथाचा तिरस्कार व हेटाळणी करणाऱ्या या लोकांना चमत्कार दाखवून त्यांची तोंडे बंद करावी' असे गोपीचंदाने ठरविले. तो चंपावतीच्या प्रेताजवळ उभा राहिला ब लोकांना म्हणाला, "लोकहो, मी चंपावतीला पुन्हा जिवंत करतो तुम्ही थांबा माझे गुरू जालंदरनाथ यांना येथे आणतो." पण लोकांचा विश्वास बसेना ते म्हणू लागले, "मृत माणूस कधी जिवंत होणार आहे का?" तो वारंवार सांगत होता, तरी त्याचे कोणी ऐकले नाही. "चार दिवस घाल घरा, मी आत्ता जातो. जालंदर ऋषीची सिद्धी अपूर्व आहे." असे तो अगदी जीव तोडून सांगत होता. तरी लोकांनी चिता रचली व चितेला अग्नी देण्याची तयारीसुद्धा केली. तेव्हा गोपीचंद स्वतः चितेवर जाऊन बसला व ओरडला, "जाळता ना? मग मला पण जाळा. मी जळलो तर मग पाहा जालंदर येईल आणि तुमचे भस्म करील!" लोक म्हणू लागले, "गोपीचंद बेडा झालाय.' 

                     तिलकचंद राजा म्हणाला, "हा बैरागी गुरूच्या नावाने गर्व करतोय काय रे काय चमत्कार करशील" तो म्हणाला, "गुरू बोलतील तसे होईल. "मग तिलकचंद म्हणाला, "चंपावतीच्या प्रेताचा डावा हात काढा. याला था, तो घेऊन हा गुरूकडे जाईल. चितेवरून खाली उत्तर" असे म्हणून तिलकचंदाने प्रेताचा डावा हात तोडून दिला व त्याला जायला सांगितले. तो येई पर्यंत प्रेत न जाळण्याचे व राखून ठेवण्याचे कबूल केले व गोपीचंद हेलापट्टण नगरापासून पाच कोसापर्यंत आला. त्याच्या हाती बहिणीच्या प्रेताचा डावा हात होता. हा नगरात आला तर सगळीकडे नसता बोभाटा होईल, हे जालंदराने अंतदृष्टीने जाणून प्रयाणास्त्र जपून भाळी भस्म लावून तो योगी वायुवेगाने गोपीचंदाला वाटेतच भेटला व त्याने "का आलास?" असे त्याला विचारले. गोपीचदाने सर्व मग जालंदर गोपीचंदासह पौलपट्टणाला वायुवेगाने आला राजप्रासादाच्या अंगणात ते शिरले, तेथे सर्व लोक शोक करीत होते. दोघांना पाहून ते लगेच उठले. तितकचंद चकित झाला.

                        चार दिवसां ऐवजी प्रहराच्या आत गोपीचंद व जालंदर आले. बाप रे! हा योगी केयदा तेजस्वी दिसतो!" असे मनाशी म्हणत राजा धावला, तो जालंदराला फार सन्मानाने वागवू लागला. पण त्याने केलेला हा सत्कार दाभिक होता. गोपीचंदाचा त्याने केवढा अपमान केला तो त्याच्या बहिणीला किती मनस्ताप दिला व त्यामुळे तीने जीव दिला हे जालंदराला कळाले होते प्रेताचा हात हातात घेऊन जालंदराने संजीवनी मंत्र म्हटला व भस्म त्या हातावरच टाकले व तत्काळ चंपावती, चल उठून ये!" असा आदेशही दिला. त्यावेळी आर्य असे झाले की चंपावती चितेवरून उठून क्षणार्धात तिथे आली. हे अपूर्व योगसामर्थ्य पाहून राजा सर्वजण जालंदरनाथाचा जयजयकार करू लागले, नंतर जालंदर पुन्हा हेलापट्टणास जाण्यासाठी निघाला, तेव्हा त्याच्या दयेची भीक मागून तिलकचंदाने सर्वांनी एकत्र भोजन करावे व नगच नाथांनी जावे." अशी प्रार्थना केली. ती मान्य करून चंपावतीलाच स्वयंपाक करण्यास सांगितले. 

                      पतीसह तिला आपल्याजवळ जेवणासाठी बसवून संजीवनी विद्येचा प्रसाद म्हणून जालंदराने आपल्या पात्रातील घास भरविला व तिला अमरत्व दिले. जालंदराने जातांना सांगीतले, तिलकचंदा, गोपीचंद पूर्ण तप करण्यासाठी बदरिकाश्रमास जात आहे. त्याचा पुत्र मुक्तचंद राज्यावर बसविला आहे. तू त्याचे रक्षण कर " ते राजाने मान्य केले. मग जालंदर हेलापट्टणास परत गेला. तेथे त्याने मुक्तचंदाला राज्यकारभाराचे शिक्षण दिले. मग तो व कानिफ पुन्हा बदरिकाश्रमात पोहोचते. तोपर्यंत बारा वर्षे गेली, गोपीचंदाचे तप पूर्ण झाले होते. मग जालंदराने गोपीचंदाकडून तपाचे उद्यापन करून घेतले. सर्व विद्या शिकवून, सर्व देवतांना बोलावून त्यांच्याकडून सर्व मंत्रांना वरदाने देवविली. अशी जालंदराने गोपीचंदाची पूर्ण तयारी करून घेतली.

अध्याय फलश्रुती :-  ब्राम्हहत्तेचा दोष संपेल, कुंभीपाक नरकातून पितरांचा उद्धार होईल.

   अध्याय समाप्त !

     || कृष्णार्पणमस्तू || 

मागील अध्याय⬅️

➡️पुढील अध्याय

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या