Subscribe Us

पांडव प्रताप ग्रंथ अध्याय पहिला || pandav pratap granth adhyay 1|| krushnarekha

।। श्री पांडव प्रताप ग्रंथ ।।

 अध्याय पहिला 

धौम्य ऋषीचे शिष्य त्यांची गुरुभक्ति


            फार वर्षांपूर्वी जनमेजय नांवाचा राजा होऊन गेला. त्याने कुरुक्षेत्र ही पुण्यभूमि करून मोठा यज्ञ सुरू केला. परंतु यज्ञ फळास जाईना. कारण त्याचे बंधू ध्रुसेन, उग्रसेन आणि भीमसेन यज्ञ रक्षण करीत होते. त्याचवेळी त्याने यज्ञाकडे येत असलेल्या एका कुत्र्यास मारले. म्हणून कुत्र्याच्या आईने ' यज्ञ सफल होणार नाही' असा शाप दिला. ती कुत्री इंद्रानें पाळली होती. त्या शापामुळे दुःखी झालेल्या राजानें सोमश्रवा ऋषी याला यज्ञ चालू ठेवण्यास सांगितलें.


          एकदां धौम्य ऋषींनी आपल्या शिष्यास शेतीस पाणी देण्यासाठी पांचाळखंडांतून पाटाने पाणी आणण्यासाठी पाठविले. परंतु पाणी अडविण्यासाठी केलेला दगडमातीचा बांध टिकला नाही. अखेर अरुणी स्वतःच त्या ठिकाणी आडवा पडला. त्यामुळे पाटांतून पाणी धौम्य ऋषींच्या शेतास मिळत होते. धौम्य ऋषींच्या ही गोष्ट लक्षात आल्यावर त्यांनी अरुणीला आशीर्वाद दिला.

          दुसरा गुरुभक्त उपमन्यू हा धौम्य ऋषींच्या गाई सांभाळीत असे. अरण्यांत भिक्षा मागून तो आपला निर्वाह करी. घौम्य ऋषींनी अर्धी भिक्षा गुरूंना द्यावी व उरलेल्यावर निर्वाह करावा असें सांगितलें. तरी उपमन्यू त्या अर्ध्या भिक्षेतहि षष्टपुष्ट राहिला. तेव्हा धौम्यांनी त्याला संपूर्ण भिक्षा गुरूंना आणून देण्यास सांगितले. उपमन्यूनें तसें केलें. तो आतं रानांत भूक लागल्यावर गाईनें दूध पिऊ लागला. धौम्यांनी परत त्याला विचारलें, तूं 'उदरनिर्वाह कसा करतोस.' त्याने सांगितले, 'मी दूध पिऊन राहतो.' तेव्हां गुरू म्हणाले, अरे, दूध उद्टें होतें. तसें करू नकोस, '


         उपमन्यू दुसरे दिवशी रानांत गेला. त्याला फार भूक लागली. अखेर त्याने रुईचा चीक काढून खाल्ला; पण त्यामुळे स्पाचे डोळे गेले. सायंकाळी आश्रमाकडे गाई घेऊन येत असा तो वाटेंत विहिरीत पडला. इकडे रात्र खूप झाली. धौम्यऋषी उपमन्यूचा शोध घेत अरण्यांतून हाका मारीत फिर लागले. एका विहिरीत उपमन्यूनें ओ दिली. त्याला गुरूंनी वर काढले. सर्व हकीकत ऐकल्यावर धौम्यऋषी उपमन्यूवर संतुष्ट झाले. गुरूच्या आदेशावरून उपमन्यूनें अश्विनीकुमाराची प्रार्थना केली.अश्विनीकुमारांनी त्याला पुन्हा दृष्टी दिली आणि तूं महाज्ञानी होशील असा आशीर्वादहि दिला.

          घौम्यांचा तिसरा शिष्य वेद. तो गुरूंची तत्परतेनें सेवा करी.त्यामुळे परपींनीं प्रसन्न होऊन त्याला अंतर्ज्ञान प्राप्त करून दिले. एकदा असा हा ज्ञानी वेद जनमेजयाचे यज्ञांत ऋत्विज करण्यास गेला असता त्याच्या आश्रमांत त्याने आपल्या पत्नीच्या रक्षणासाठी आपला शिष्य उत्तंग याला मागे ठेवले.इकडे वेदमुनींच्या पत्नीची कामवासना जागृत झाली. तिने वासनापूर्तीसाठीं उत्तंगास विनंती केली, परंतु तिला आईप्रमाणें मानून तो निघून गेला. बेदमुमी परत बाल्बाभर त्यांनी अंतर्ज्ञानाने सर्व प्रकार ओळखला पश उतंगास सर्व विद्या प्राप्त होतील असा आशीर्वाद दिला आणि त्याम घरी परत जाण्यास सांगितले. उर्तंगाने गुरुदक्षिणा काम देऊ असे विचारले. तेव्हा गुरूंनी आपल्या पत्नीस काहीहि मागणे मागण्यास सांगितले. गुरुपत्नी म्हणाली, चार दिवसांनी मला मंगल कार्य करायचे आहे. तेव्हां युवराजाच्या पत्नीच्या कानांतील दिव्य कुडले मला हवी आहेत. 


         तेव्हां गुरूची आज्ञा घेऊन उत्तंग युवराजाकडे निषाला वाटेत बैलावर बसलेल्या एका माणसाने त्याला गोमूत्र व शेण दिले. तें खाऊन तो पुढे निषाला, त्याच्या तोंडास थोडे शेण व गोमूत्र तसेंच चिकटून राहिले होते. त्याम स्थितीत त्याने युवराजाची भेट घेऊन आपण येण्याये कारण सांगितले. युवराजाने त्याला तोंड स्वच्छ धुवून बा तरच राणी तुझ्या दृष्टीस पडेल असें सांगितलें, तसे करून तो राणीकडे गेला. राणीनें आपली कुंडलें उत्तंगास दिली. पण अत्यंत जपून वागण्यास सांगितले. ती घेऊन उतंग निषारा, तक्षकाला ही गोष्ट समजतांच त्याने उत्तंगाचा पाठलाग सुरू केला. उत्नंगास तहान लागल्याने तो कुंडलें कांठावर ठेव्न पाणी पिण्यास विहिरीत उतरला, तेबल्यांत तक्षकानें कंडलें पकविली. उत्तंगाने त्याच्या मार्गे धावण्यास सुरुवात केली. तक्षक एका विळांत शिरला. उत्तंगाने ते विवर नागभूमीपर्षत खणलें. इतक्यांत स्याला एका महापुरुषानें वोब्बाच्या गुदद्वारावर फुंकर मारण्यास सांगितलें. फुंकर मारतांच त्या घोड्याच्या तोंडातून ज्वाला निघू लागल्या. त्यामुळे सर्व सर्प तडफडू लागले. अखेर तक्षक शरण आला. त्याने कुंडलें परत दिली. त्याच घोड्यावर आरूढ होऊन उत्तंग आपल्या गुरूकडे आला. त्याने ती कुंडलें गुरुपत्नीला दिली. गुरूला व गुरूपत्नीला संतुष्ट केलें, केवळ गुरूच्या कृपेमुळे आपण अनेक संकटांतून बांचलों म्हणून उत्तंगाने गुरूचे पाय धरले. त्याला गुरूने आशीर्वाद दिला. तक्षकावर सूड उगवण्याची त्याची इच्छा उफाळून आली. तो जनमेजयाला भेटून म्हणाला, 'जनमेजया, परीक्षिताचा-तुझ्या पित्याचा-तक्षकानें प्राण घेतला होता. तेव्हा त्याची आठवण ठेवून तूं तक्षकाला घडा शिक्विला पाहिजेस' असे सांगून उत्तम गानें जनमेजपास सर्पसत्र करण्यास प्रवृत्त केले .


                 च्यवनभार्गवाचा पुत्र प्रतीत यास रूरू नांचवाचा पुत्र होता. त्याची पत्नी सर्पदंश होऊन मृत्यू पावली. रूप आपली पत्नी जिवंत व्हावी म्हणून यमधर्माची प्रार्थना केली. इतकेच नव्हे तर आपले सर्व पुण्य तो यमराजास अर्पण करू लागला. त्यामुळे यम प्रसन्न झाला. त्याने रूरूच्या पत्नीस पुन्हा सजीव केले. परंतु सर्पाचा सूड उगवण्यास रूरूने सुरवात केली. एकामागून एक सर्प तो मारू लागला. तसेच एकदा त्याची व डुईभ नांवाच्या अजगराची गांठ पडली. डुईंभानें रूरूस शरण जाऊन प्राण रक्षणार्थ विनंती केली. तो म्हणाला 'मी मूळचा खगऋषी परंतु खोटा साप करून मी ऋपींना भीति दाखवीत असे. त्यामुळे मला शाप मिळाला आणि मला हैं रूप प्राप्त झाले. हे पहा रूरू सर्पाच्या आईनेच त्यांना शाप दिला आहे. जनमेजय सर्पसत्र करील त्यांत बरीचशी सर्पकुळी नाश पावेल. अशी हकीकत सांगून डुईभ एकाएकी दिव्यदेहधारी झाला आणि स्वर्गास गेला.

            फार वर्षापूर्वी कश्यपाने दक्षकन्या कद्रू व विनती यांच्याशी विवाह केला. दोघीहि पतीसेवा तत्परतेने करीत. पण स्त्रीसुलभ सवतीमत्सर मात्र दोघींच्याहि ठिकाणी होताच. कश्यपाने दोघींनाहि भरपूर सुख दिले आणि अखेर त्यांना वर देऊन तो परमेश्वर चिंतनासाठी निघून गेला. कद्दू एक हजार पुत्र होतील आणि विनतेस दोन पराक्रमी पुत्र होतील असे ते वर होते. काही दिवसांनी योग्य वेळी कट्टनें एक हजार व विनतेने दोन अंडी घातली. त्याला बरीच वर्षे लोटल्यावर कदूच्या अंड्यांतून एक हजार सर्प जन्माला आले. त्यांत शेष, बासुकी, कर्कोटक, तक्षक है होते. पण बिनतेची अंडी फुटेनात. तिचा मत्सर जागा झाला. तिने आपलें एक अंडे बळेंच फोडले. त्यांतून अरुण जन्माला आला. पण त्याचे पायाकडचे अवयव परिपूर्ण झाले नव्हते. त्याचा वर्ण लाल होता. स्वतःच्या अपूर्ण बाढलेल्या शरीरामुळे त्याने आईला शाप दिला कीं, 'तूं एक हजार वर्षे कट्वचें दास्य पत्करशील. ' इतके सांगून अरुण म्हणाला, 'दुसरें अंडे मात्र तूं फोई नकोस. योग्य वेळी ते फुटेल व पराक्रमी गरुड जन्माला येईल. तो तुला शापमुक्त करील .' पुढें अरुण सूर्याचे सारध्य करू लागला. अद्यापीहि तो सूर्याचा सारथी आहे.


     कांहीं दिवस असेच गेले. एक दिवस कद् सूर्याचा घोडा पहाण्याकरता विनतेस घेऊन गेली. सूर्याचा उच्चैःश्रवा हा घोडा समुद्रमंथनांतून निघालेले रत्नच होय. समुद्रमंधनाचें कारणहि गंमतीशीर आहे. गुरूची आज्ञा मोडण्याचे महापाप इंद्रानें केले होते. शिवाय दुर्बासांनींहि इंद्रास शाप दिला. इंद्राचें सर्व वैभव समुद्रात पडले. त्रह्मदेवासहित सर्व देवांनी विष्णूची प्रार्थना केली. विष्णूनें प्रसन्न होऊन त्यांना असुराच्या मदतीने समुद्रमंथन करण्यास सांगितले. तेव्हा वली राजाकडे पाताळांत गेला व त्याचेशी करार केला की, समुद्रमंथन करून जी रत्ने निषतील तीं आपण बांटून घेऊ.


      देव दैत्य यांनी ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून मंदराचल पर्वताला रवी बनवली. वासुकीचा दोरीसारखा उपयोग केला. देवांनी मुखाकडून व राक्षसांनी शेपटाकडून धरावे, असा सल्ला दिला. पण राक्षसांना तो अपमान वाटला. ते म्हणाले, 'आम्ही सबल आहत, आम्ही प्ुखाकहून घरणार.' राक्षसांचे म्हणणे मान्य करून समुद्रांत पर्वत घातला. पण पर्वत आंत बुडू लागला, तेव्हा विष्णूने कासवाच्या रूपानें पर्वत वरचेवर साबरला. नंतर मैथनास सुरवात झाली. सर्व विश्व हादरूं लागलें, ताणाप्रळें बासुकीच्या तोंडातून विषाश्री बाहेर पडू लागला. अखेर त्याच्या तोंडातून काळकुट वीप बाहेर आले. त्यामुळे दैत्यांचा दाह होऊ लागला. शेवटी शंकराची करुणा भाकल्याबर केवळ उपकार म्हणून शंकराने तें वीप आपल्या कंठांत धारण केलें. त्यामुळे त्याचा कंठ निळा झाला.


         समुद्रमंथनांतून चौदा रत्ने मिळाली. ती देवांनी व दैत्यांनी वाटून घेतली. कमला, कौस्तुभ, शार्डधनुष्य व शंख ही विष्णूला अर्पण करण्यांत आली. वसिष्ठांना कामधेनू दिली. सूर्याला उच्चैःश्रवा हा घोडा मिळाला. चंद्र आकाशांत राहिला. रंभा, पारिजातक व ऐरावत ह्या वस्तु इंद्रानें नेल्या. दैत्यांच्या वाट्याला मुरा आली. अखेरीस सप्तुद्रांतून धन््ंतरी बाहेर आला. त्याच्या हातांत अमृतकुंभ होता. राक्षस सर्व रत्ने देवांनी नेली म्हणून अगोदरच नाराज होते. त्यांनी चलाखी करून अमृतकुंभ पळवला. त्यामुळे देवांस फार दुःख झाले व ते युद्धग्रवृत्त झाले. पूर्ण विचार केल्यावर विष्णूनें मोहिनीचे रूप धारण केलें. सर्व देव व दैत्य आपापसांतलें वैर विसरून त्या विश्वसुंदरीभोवती गोळा झाले. बलिराज या मोहिनीवर अनुरक्त झाला. त्याला वाटले या सर्व रत्नांपेक्षा आपल्याला ही मोहिनी मिळाली तरी पुरे. इतक्यांत मोहिनीनेच चळीला विचारलें, अरे, तुम्ही असे युद्धास सज्ज का झाला आहांत ?

              तेवढ्यावरच आनंद मानून बळीने सर्व हकीकत सांगितली. तेव्हां मोहिनी म्हणाली, ' हे सर्व देव फार लबाड आहेत. त्यांनी तुम्हांला फसवले. आतां मीच तुम्हाला है अमृत वाटून देते.' असे सांगून तेथे मायेनेंच मोहक असे मंडप तयार केले. देवांना व राक्षसांना वेगवेगळे मंडप देऊन त्यांना ओळीने पंगत करून बसण्यास सांगितले. प्रथम देवांना मोहिनी अमृत वाढू लागली, पण राहून मात्र विष्णूचें खरें स्वरूप ओळखले होते. त्याने स्वतः देवाचें रूप घेतलें व देवांच्या पंगतीत जाऊन बसला. मोहिनीने सर्वांच्या हातावर अमृत वाढलें. राहुच्याने रहाबलें नाहीं. त्याने तें अघाशीपणें पिऊन टाकले. ही गोष्ट चंद्र-सूर्याच्या लक्षात येताच त्यांनी मोहिनीस खूण केली. मोहिनीने अंतर्ज्ञानाने ओळखले की, हा दैत्य आहे. मोहिनीने आपल्या कानांतले कर्णभूषण काढून त्याच्या सहाय्याने राहूचे शीर उडवले. ते शीर एकदम आकाशांत उडालें. पण मुखाने मात्र त्याने राक्षसांना सांगितले की, 'ही मोहिनी नसून साक्षात् विष्णु आहे आणि राक्षसांना अमृत मिळू देणार नाहीं.


         हे ऐकताच राक्षस संतापले. त्यांनी देवांशी युद्ध सुरू केले. त्यांत देवांचा पराभव होण्याची वेळ आली; तेव्हां नरनारायणाचे रूप घेऊन विष्णूने देवांना सहाय्य केलें व त्यायोगें देवांना विजय मिळाला. परंतु तेवढ्याने राक्षस गप्प थोडेच बसणार ! त्यांनी पुन्हा युद्धाची तयारी केली. शेवटी ब्रह्मदेवाने नारदास देवदानवांत मध्यस्थी करण्यास पाठविलें. नारदाने बळीकडे येऊन बळीची स्तुति केली. त्याला इंद्रपद प्राप्तीसाठी विश्वजित यज्ञ करण्यास सांगितले. त्याप्रमाणे बळीने शंभर यज्ञ पूर्ण केले. इंद्राला भीति वाटल्याने त्याने विष्णूकडे धाव घेतली. विष्णूनें वामनाचे रूप घेऊन बळी राजाला पाताळांत दडविले व तेथे त्याला कायमचे राज्यपद प्राप्त करून दिले.

         ! पहिला अध्याय समाप्त !

     || कृष्णार्पणमस्तू || 


➡️पुढील अध्याय 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या