Subscribe Us

श्री नवनाथ भक्तिसार अध्याय २२ (मराठी भाषांतर ) || navnath bhaktisar adhyay 22

।। श्री नवनाथ भक्तीसार ।।

 अध्याय :-२२ 

 मीननाथांना दगडावर आपटून धुतले 


॥ श्री गणेशाय नमः ।। श्री सरस्वत्यै नम: ।। श्री गुरूभ्यो नम: || श्री नवनाथ सिद्धांना नमस्कार असो.

            उपरिचर वसू व मैनाकिनी दोघेजण तिच्या प्रासादात गेली. वसू तिला सांगू लागला. "मैनाकिनी, शोक करू नकोस, या जगात सर्वच क्षणिक आहे. तू कशासाठी रडतेस? तू कोण ? मच्छिंद्र कोण? तू येथे आलीस, मच्छिंद्राचा व तुझा सहवास झाला हा योगायोग. तू आपल्या हिताचा विचार कर की! तू जेथून आलीस तेथे चल. सिंहलद्वीपात चल. बारा वर्षांनी मच्छिंद्रनाथ तुला भेटेल, मीननाथ भेटेल, गोरक्षनाथ भेटेल, इंद्र एक मोठा यज्ञ करील, तेव्हा सिंहलद्वीपात तिन्ही देव, चंद्र व सूर्य व नवनाथ एकत्र जमतील. ते तू पाहशील. आता शोक करू नकोस. तुझी श्रेष्ठ दासी दर्भामा आहे ना, तिला राज्यावर बसव!" तिला ते पटले मग तिने दैर्भामा दासीला राणी बनविले. उपरिचर वसूबरोबर ती विमानात बसून निघाली. उपरिचर तिला घेऊन गगणातून सिंहलद्वीपला गेला. त्याने दिला तिच्या मूळ ठिकाणी नेले व पुरे तोही स्वस्थानाला निघून गेला.

             गोरक्षनाथाने मीननाथाला आपल्या खांद्यावर घेतले होते. अनेक गावे फिरत ते गौडबंगाल देशात आले. तेथे आंबराईजवळ मीननाथाला खांद्यावरून खाली ठेवले व त्या जागेला वंदन करून गोरक्ष रडूच लागला. रडण्याचे कारण मच्छिंद्राने विचारले, तेव्हा भरून आलेल्या गळ्याने गोरक्षाने म्हटले, "गुरूमहाराज, याच ठिकाणी कानिफाने मला तुमचा ठावठिकाणा सांगितला, म्हणून तर हे निधान मला पुन्हा सापडले." पुढे वाटेत हेलापट्टण नगर लागले, तेव्हा गोरक्षाने मच्छिंद्राला जालंदर, गोपीचंद राजा व मैनावतीची कथा सांगितली. भेटीनंतर मैनावतीने त्या तिघांचा यथासांग गौरव करून तीन दिवस त्यांना ठेवून घेतले ते तिघे निघून निघाले.

                 त्यानंतर ते जगन्नाथपुरी येथे गेले आणि पुढे इतर देश पाहात पाहात सौराष्ट्रात गेले. तेथे एका गावाच्या बाजूला ते उतरले व रात्री तिथे वस्ती केली. सकाळी गोरक्ष व मच्छिंद्र उठले. आपली आन्हिके उरकून गोरक्ष भिक्षेला गेला. तो चारसहा घरी भिक्षा मागून परत आला. गोरक्ष आल्यावर मच्छिंद्र त्याला म्हणाला, "गोरक्षा, मीनाला मी तिकडे शौचाला बसविले आहे. त्याला धुवून आण." गोरक्ष गेला. बघतो तो काय ! अज्ञ बालक, सर्व घाण अंगाला लडबडून घेतलेली. ते पाहून गोरक्षाचे मन पार बिटले. मच्छिंद्राने त्याला "नदीवर नेऊन सर्वांग निर्मळ करून आणण्यास सांगितले. गोरक्ष त्या तशाच अवस्थेतल्या मीननाथाला घेऊन नदीवर गेला. त्याने पटकन त्या पोराला उंच उचलून गरगरा फिरवले व खडकावर आपटले. तो तत्काळ मेला रक्त वाहू लागले. प्रकल लागले. हा गोरक्षा हाला बरे झाले. कुणातरी प्राण्यांची पोटे भरत आहेत. मग त्वचा स्वच्छ धुन खांद्यावर टाकली आणि स्वारी परत धर्मशाळेत आली. मच्छिंद्रनाथ तेन्हा भावात गेला सेता गोरक्षा मीननाथाची कातडी बाहेर एका बाजूला झाडाच्या फांदीवर वाळत घातली आणि जरा वेळाने मच्छिंद्रनाथ परत आला. स्त्रीराज्यात असतांना त्याला मद्यपान करण्याची सवय लागली होती. ती पुरी करून घेण्यासाठी तो बाहेर गेला होता. परत येतो तो गोरक्ष निवांत बसलेला.

                 "गोरक्षा ? मीननाथ कुठे आहे?" "तुम्ही त्याला स्वच्छ करून आणायला सांगितले होते ना, तो आणलाय." "कुठे आहे?" "तो काय वाळत घातलाय !" मच्छिंद्र पहातो तो फांदीवर स्वच्छ ओली त्वचा. "हाय रे गोरक्षा ! तुला काय सांगितले नि तू केलेस तरी काय ?" गोरक्षाने सर्व काही सांगितले आणि मच्छिंद्राने मीननाथाच्या आठवणी काढून आक्रोश केला. गोरक्षावर तो संतापला. मीननाथाची कातडी कवटाळून त्याने ती पुन्हा अश्रूंनी भिजविली. त्याचे दुःख पाहून गोरक्ष म्हणाला, "गुरूजी, एवढा शोक करता? बरे तर हा घ्या तुमचा मुलगा !" असे म्हणून त्याने संजीवनी मंत्राचा भस्मावर जप करून ते भस्म त्या कातडीवर टाकले. तो काय! "बाबा, बाबा!" असे ओरडत मीननाथाने मच्छिंद्राच्या गळ्याला मिठी मारली. मच्छिंद्राने त्याला आनंदाने पुन्हा अश्रूंनी न्हाऊ घातले. गोरक्ष म्हणाला, "गुरूजी, तुम्ही संजीवनीने त्याला स्वतः जिवंत करू शकला असता. मग उगीच मोहाने रडत का बसलात? तुम्ही विरक्त, तुम्ही आत्मज्ञानी, तुम्हाला माहीत आहे ना, मीननाथ हे नाव व त्याचा देह हे आभास आहेत. तो अविनाशी आत्माच आहे. त्याला मरण कसे येणार? मग तुम्हाला रडायचे काय कारण?"

               मच्छिंद्र म्हणाला, “अरे गोरक्षा, आता कुठे तू सर्व मायाममता पार करून हंसपदवीपर्यंत पोहोचला आहेस. मीननाथ हा भास हे खरे ना? अरे, मायेच्या क्षेत्रात सर्व नाटकच माझे रडणे हा सगळा भासच. मी रडण्याचे काय कारण? तुला शिकवायला. मी मीननाथाला निर्मळ करून आणण्यास तुला सांगितले. ते तू बरोबर केलेस; पण पाहा गंमत. तुला त्याची विष्ठा पाहून वाईट वाटले. ती वृत्ती तरी का उठली? मीननाथाला मारण्याचे कर्म, माशांना रक्तमांस घालून मोठे परोपकाराचे काम करतो असे मानणे, हे सगळे तरी काय? माझ्या रडण्यासारखे मायेच्या क्षेत्रातले क्षणिक, खोटे. तीही सगळी भ्रांतीच. तेव्हा सर्व शरीरधर्मच खोटे आहेत हे ओळख. " गोरक्ष थरारला. आपली चूक त्याच्या लक्षात आली. "मच्छिंद्र मैनाकिनीच्या राज्यात राहिला तो केवळ मारुतीला वचनातून सोडविण्यासाठी. त्याचे आपले काम तेथे काहीच नव्हते एकूण ! आणि आपण मात्र "गुरूला मायेच्या बंधनातून सोडवितो असा विचार करून सूक्ष्म गर्व केला." असे अनेक विचार करून तो मच्छिंद्राच्या पाया पडला. त्याने त्या गुरूची क्षमा मागितली. मच्छिंद्र म्हणाला, “गोरक्षा, मी पण तुझी कसोटीच पाहिली. आता कशाचेही वाईट वाटून घेऊ नकोस." त्यानंतर ते तिघे पुढील यात्रेस निघाले.

अध्याय फलश्रुती :- ज्ञानसंपन्न मुलगा होईल, व तो विद्वानांना मान्य होईल.

   अध्याय समाप्त !

     || कृष्णार्पणमस्तू || 

मागील अध्याय⬅️

➡️पुढील अध्याय

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या