Subscribe Us

श्री नवनाथ भक्तिसार अध्याय २९ (मराठी भाषांतर ) || navnath bhaktisar adhyay 29

।। श्री नवनाथ भक्तीसार ।।

 अध्याय :-२९ 

 गोरक्षनाथांनी मंत्राने असंख्य पिंगला निर्माण केल्या 


।। श्री गणेशाय नमः ।। श्री सरस्वत्यै नम: ।। श्री गुरूभ्यो नम: ।। श्री नवनाथ सिद्धांना नमस्कार असो.

               गोरक्षनाथ गर्भाद्रि सोडून, मच्छिंद्रनाथांचा निरोप घेऊन पुन्हा तीर्थयात्रेला निघाला सोन्याच्या विटेऐवजी सातच सोन्याचा त्याने मच्छिंद्राची साधुभोजनाची इच्छा पूर्ण केली होती. तीर्थयात्रा करीत करीत गोरा गिरनार पर्वतावर गेला. तेथे दत्तात्रेयांची श्रीद म्हणाले, माझा आवडता असा भर्तरी नावाचा शिष्य आहे. तो गेली बारा वर्षे त्याची पत्नी पिंगला हिच्या मृत्युने दुःखी होऊन स्मशानात राहिला आहे. त्याला युक्तीने शोकापासून सोडव. हा भर्तरी म्हणजेच द्रुमिल नारायण आहे.

संपुर्ण श्री नवनाथ भक्तीसार ग्रंथ

            गोरक्षाने दत्तांची आज्ञा मानली. त्यांचा आशीर्वाद घेऊन तो निघाला. व्यान मंगून त्याने आपल्या कपाळी भस्म लावले. त्यामुळे मधील अंतर फारच थोड्या वेळात कापून तो अवंती नगरीजवळ येऊन उतरला. स्मशानात जाऊन त्याने भर्तरीला पाहिले, तेव्हा भर्तरीला ताळ्यावर आणण्याचा त्याचा उत्साह पार मावळला. "काय हा वाळलाय ! हाडांचा सापळा उरलाय नुसता ! याला काय उपदेश करणार, कपाळ ? अरेरे! एका स्त्रीसाठी इतका वेडा झालाय! तो मच्छिंद्र तसा नि हा असा ! याचे मन काही माझा उपदेश घेणार नाही. आता काय करावे? इतक्यात त्याला एक युक्ती सुचली. त्याने नगरात जाऊन कुंभाराकडून एक मडके घेतले. मग त्याने त्याला रंग देऊन बाहुलीसारखे दिसेल असे केले. 

              ती बाहुली घेऊन तो भर्तरीच्या जवळून चालत गेला व चालता चालता ठेच लागल्यासारखे करून धाडकन खाली पडला. ते मडके फुटले. लगेच गोरक्षाने हंबरडा फोडला. मडक्याचे तुकडे जवळून पाहू लागला. रडू लागला. "हाय! हाय माझी प्राणेश्वरी मेली. कशी ग मला दुःखात लोटून गेलीस!" असे म्हणत तो एवढा आक्रोश करू लागला की, क्षणभर भर्तरी आपले दुःख विसरून म्हणाला, "अरे गोसाव्या, कसली बाहुली घेऊन बसला आहेस? मडके ते! दीडदमडी टाकलीस तर दुसरे मिळेल. मडकेच ते केव्हातरी फुटणारच! त्यासाठी एवढे रडायला काय झाले?"

                   गोरक्ष म्हणाला, "हो तुम्हाला काय ? ज्याचे जाते त्याला कळते. ज्याचे दुःख त्याला तुम्हाला ते मडके दोन अडक्यांचे वाटणारच. पण माझी बाहुली होती ती माझी माय होती, माझी बहीण होती. तुम्ही तरी बारा वर्षे मसणवटीत रहात आहात ते काय म्हणून? तुमची कोणती पिंगला की बिंगला होती, तिच्यासाठी तुम्ही का झुरता ?" भर्तरी म्हणाला, "अरे मातीचे मडके कुठे नि हाडामांसाची स्त्री कुठे! मडके दुसरे येईल? पण माझी पिंगला का परत येणार आहे?" गोरक्ष म्हणाला, "मी एकच नाही, एक हजार पिंगला तुझ्यासमोर उभ्या करतो, तू कशाची पैज लावतोस बोल!” भर्तरी म्हणाला, “तू जर माझी पिंगला मला प्रत्यक्ष आणून दाखवशील तर मी तुला माझे राज्यवैभव अर्पण करीन." लगेच गोरक्षाने भस्म हातात घेतले, त्यावर पिंगला नाव घेऊन कामिनी अस्त्राचा मंत्र म्हटला आणि भस्म आकाशात उडवले.

               तो काय आश्चर्य! त्या ठिकाणी गगनमार्गाने पिंगला आली. तिच्या शरीरातून सहस्रावधी पिंगला मूर्तिमंत होऊन प्रकटल्या आणि भर्तरीच्या भोवती जमल्या. त्यांना भर्तरी संसारातील त्यांच्या गुप्तखुणेच्या गोष्टी विचारू लागला आणि त्यांनी न चुकता सर्व सांगितल्या, मग पिंगला जी प्रथम पुढे आली ती म्हणाली, "रावा, तुमच्या विरहामुळे मी अनीत प्रवेश केला. मी स्वर्गात गेले. पण माझ्या विरहामुळे तुम्ही व्यर्थ शिरावर दुःख घेतले.

                पिंगलेला भर्तरीची स्थिती पाहून फार वाईट वाटले. ती पुढे म्हणाली, "नाथ, गोरक्षनाथामुळे मी पुन्हा भूमीवर देऊ शकले. जरी आता आले  तरी पुन्हा तुम्हाला व मला मृत्यू अटळच आहे." भर्तरीला वाटले, गोरक्षाची कृपा म्हणूनच पिंगला आपल्याला पुन्हा मिळाली. तो त्याच्या पाया पडण्यासाठी धावला. पण गोरक्ष म्हणाला, “आता तुला राज्यवैभव हवे? का पिंगला हवी? का पंथात येतोस?" भर्तरी म्हणाला, “तुम्ही एका मंत्राच्या प्रभावाने पिंगला भेटवता काय! तुमच्या योगाचे ऐश्वर्यच श्रेष्ठ आहे. मला तुमच्याबरोबर न्या!" गोरक्षाने पुन्हा एकदा भर्तरीला विचारले, "तुझे काय ठरले? राज्य व स्त्रिया, ही सुखाची माया, की योग? एकदा ते नक्की सांग?" भर्तरी डोळ्यात प्राण आणून म्हणाला, "महाराज, मला यातून सोडवा." तेव्हा विक्रमाला साक्षी ठेवून गोरक्षाने भर्तरीला नाथपंथाची रीतीप्रमाणे दीक्षा दिली. शिंगी, झोळी वगैरे देऊन तो अशक्त भर्तरी गोरक्षाच्यापुढे उभा राहिला व नमस्कार करून म्हणाला, "महाराज, मला येथून घेऊन चला. भगवान दत्तात्रेयांचे दर्शन केव्हा घडेल अशी तळमळ लागली आहे."

              नंतर गोरक्ष म्हणाला, "तू खरा विरक्त झाला असलास, तर अंतःपुरात जाऊन तुझ्या स्त्रियांजवळ भिक्षा माग, होऊन जाऊ दे एकदा परीक्षा!" भर्तरीने मान्य केले. तो अंत:पुरात शिरला. त्याने आपल्या अशक्त दुबळ्या आवाजात 'अलख निरंजन' गर्जना केली आणि आपल्याच स्त्रियांकडे भिक्षा मागितली. सर्व मायामोह सोडून भर्तरी हळूहळू नगरवेशीजवळ आला. तेव्हा गोरक्षाने त्याला पुन्हा गाठले. काही स्त्रिया मागोमाग येतच होत्या आणि आता योग घेतला तर घ्या पण 'कुठेतरी राहा. आम्ही तुमचे दर्शन घेऊन त्यातच समाधान मानू" असे त्या सांगत होत्या. 

               पण त्यांना विक्रमाने परतविले. नगरापासून पुष्कळ अंतर चालल्यावर प्रत्येक पावलागणिक ते राजवैभव दूरदूर राहात गेल्यावर गोरक्ष भर्तरीला म्हणाला, "भर्तरी, तू अशक्त आहेस, चिंता करू नकोस. हे शक्तिदायक मंत्राने युक्त भस्म तुझ्या भाळावर लावतो" असे म्हणून त्याने भर्तरीच्या कपाळावर भस्म लावले. त्यामुळे भर्तरीच्या अंगी शक्तिचा प्रवेश होऊन, जरी तो पुष्ट नव्हता तरी उत्साही झाला. मग गोरक्ष व भर्तरी यांनी गिरनार पर्वतावर श्रीदत्तात्रेयांची भेट घेतली. गोरक्षनाथाला व भर्तरीला श्री दत्तात्रेयांनी प्रेमाने कुरवाळले.

अध्याय फलश्रुती :- क्षयरोग बरा होऊन, त्रिविध ताप संपेल.

   अध्याय समाप्त !

     || कृष्णार्पणमस्तू || 

मागील अध्याय⬅️

➡️पुढील अध्याय

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या