।। श्री नवनाथ भक्तीसार ।।
अध्याय :-३६
रेवणनाथ व भगवान शंकर यांचे युद्ध
।। श्री गणेशाय नमः ।। श्री सरस्वत्यै नम: ।। श्री गुरूभ्यो नम: ।। श्री नवनाथ सिद्धांना नमस्कार असो.
यमाकडून रेवणनाथ कैलासास गेला. कैलासद्वारावर शिवगणांनी त्याला अडविले. त्यांचे आणि रेवणनाथांचे मोठे अस्त्रयुध्द झाले. त्यांनी आठ अस्त्रे एकदम सोडली, तर भस्माच्या एकाच चिमटीने भैरवांना हतबल केले. ते शंकरांना समजताच नंदीवर बसून, चक्र, खड्ग, बाण, अंकुश, त्रिशुल, डमरू, शंख, नरकपाळ इत्यादींनी युक्त होऊन शंकर धावले. भगवान शंकर युध्दाला येत आहे असे पाहून, रेवणाने वाताकर्षण मंत्र म्हणून भस्म फेकले. शिवगण आणि शिव, नंदीसह मुच्छींत पडले. तेव्हा गंधवांनी रमापती विष्णूला त्वरेने जाऊन ते वृत्त सांगितले.
तेव्हा तातडीने तेथे येऊन विष्णूने रेवणला विचारले, "का रे बाबा! एवढा आकान्त का मांडलास ?" तेव्हा रेवणनाथ म्हणाला, “सरस्वती ब्राह्मणांच्या सातही पुत्रांचा शंकराने संहार केला त्यामुळे तो ब्राह्मण दुःख करीत आहे. मी मुलांना परत घेऊन जाणार. संजीवनी मंत्राने त्या ब्राह्मणाचे सातही पुत्र माझ्याकडे आले आहेत. मी त्यांचे जीवात्मे तुला देतो. पण त्यांच्यासाठी आता तुलाच देह तयार करावे लागतील. " रेवणाने ते मान्य केले. मग त्याने आपली अस्त्रे आवरून घेतली. शंकर नंदी, भैरव आणि तेराशे शिवगण सर्व मुळच्या स्थितीत आले. विष्णूने रेवणाला सात जीवात्मे दिले.
तो विष्णुला वंदन करून व्यानास्त्राच्या साह्याने विटे गावी आला व ब्राह्मणाला म्हणाला, "मी कैलासावर गेलो. शंकराचा पराभव केला. विष्णूने शरण येऊन मला तुझ्या सातही मुलांचे जीवात्मे दिले आहेत. आता प्रश्न असा आहे की त्यांचे देह कोठले? तू जर एक काम करशील तर ते शक्य होईल, हा तुझा जो सातवा पुत्र आहे. त्याचा अचेतन देह आहे ना! तो कुटून एक मेणासारखा गोळा कर. त्याचे सात भाग करून साती जीवांपासून सात पुत्र जन्माला घालतो." हे काम करायला ब्राह्मण तयार होईना. पण रेवणाचा विश्वास वाटून त्याने तसे केले. मग त्या सात गोळ्यांमध्ये जीव घालून रेवणनाथाने सात पुत्र उत्पन्न केले.
सरस्वती ब्राह्मण व जान्हविका यांना फार आनंद झाला. साती मुलांची नावे सारंगीनाथ, जोगीबानाथ, निजानंद, नयननाथ, यदुनाथ, निरंजननाथ व गहिनीनाथ अशी ठेवण्यात आली. ते रेवणनाथाचे शिष्य झाले. विटे गावी रेवणसिध्दाचे स्थान अजुनही आहे. ही कथा श्रवण केल्यास संतती जगेल. अल्पायुषी मरणार नाही, असे गोरक्षनाथाचे वचन आहे. नवनारायणांचे अवतार कलीयुगात होण्याचे आधी ठरलेच होते. सरस्वतीविषयी ब्रह्मदेवाच्या मनात प्रेम उत्पन्न होऊन त्यांचे तेज पतन झाले, ते अचानक एका वटवृक्षाच्या बुंध्यात लपून राहिलेल्या पद्मीनी नावाच्या सर्पिणीच्या डोक्यावर पडले. ते काहीतरी भव्य असणार म्हणून तिने गिळले. आस्तिकाला ही गोष्ट समजली आणि पद्मीनीच्या पोटात आविर्होत्र नारायण त्या ब्रह्मतेजाच्या आधाराने जन्म घेणार हेही त्याला समजले व त्याने तिला ते सांगितले. जनमेजयाच्या सर्पसत्रातून तिला वाचवावे म्हणून 'आस्तिकाने वडाच्या त्या बुंध्यात तिला लपून रहायला सांगितले व वज्रप्रयोग करून तिचे संरक्षण केले.
इकडे सर्पिणी पद्मिनीने एक तेजस्वी अंडे घातले. ते अंडे फोडून एक तेजस्वी बालक जन्माला आला. पद्मीनी तेथून निघुन गेली. झाडाच्या बुंध्यात तो बालक जन्माला आला. पद्मीनी तेथून निघुन गेली. झाडाच्या बुंध्यात तो बालक गुप्त होता. पुढे तेथे कोशधर्म नावाचा एक गरीब ब्राह्मण आला. वटपत्रांच्या पत्रावळी बनविण्यासाठी तो पाने काढण्यास वर चढला. त्याला बाळाचे रडणे ऐकू आले. तेवढ्यात देवांनी आकाशवाणी प्रगट केली. “वडाच्या झाडामध्ये जो बालक आहे, त्याचा तू सांभाळ कर. तुझे कल्याण होईल." आकाशवाणी ऐकून त्या ब्राह्मणाने त्या मुलाला घरी नेऊन सुरादेवी नावाच्या आपल्या पत्नीजवळ दिले वटसिध्द नागनाथ असे त्याचे नाव ठेवले. सातव्या वर्षी त्याची मुंज झाली. तो मुलगा 'काशीविश्वेश्वर मंदिराजवळ खेळ खेळत असे. लुटूपुटीच्या मेजवान्या घालीत असे. खोटेखोटेच पदार्थ वाढीत असे. दत्तात्रेयांनी पण मुलाचे रूप घेतले व ते त्या मुलांत मिसळून, "मी अतिथी आलो आहे. मला अन्न मिळेल का?" असे विचारले तेव्हा, "तू नको येऊ आमच्यात. चल" असे म्हणून मुले त्याला हुसकावून लावू लागली.
नागनाथाने ते पाहिले. त्याने त्याला अतिथी मानून जेवणाला घेतले. त्याची मनानेच पूजा केली गंध लावले. सर्व उपचार लटकेलटकेच केले. पण त्याचा विनय, आतिथ्य वगैरे पाहून दत्तात्रेयांना वाटले, हा कोणीतरी योगी आहे खास. तो आविर्होत्र नारायण आहे. हे त्यांनी ओळखले. त्यांनी त्याला सिध्दी दिली, "तुला जो अन्नपदार्थ हवासा वाटेल तो इच्छेने उत्पन्न होईल. मग त्याला सांगितले, हे खोटेखोटे जेवण घालतोस, त्याजागी आता सर्वांना खरोखरीचे अन्न खायला घाल!" त्यावेळी नागनाथाने खरोखरीच सर्व मुलांना पक्वान्नांचे जेवण दिले. रोज मुलांना जेवण देण्यास नागनाथाने प्रारंभ केला.
आईबापांनी विचारले तर मुले सांगू लागली, “तुम्ही काय खाता? कदान्न? आम्ही चमचमीत जेवण घेतो. नागनाथ आम्हांला वाढतो." हे सर्व प्रकार कोशधर्माला साहजिकच कळले. कोशधर्माने मुलाला सगळे विचारले, तेव्हा त्याने त्यालाही हातावरच सर्व मिष्टान्न भोजन दिले. त्याने मुलाला विचारले, "ही सिध्दी कोणी दिली?" "आमच्या लुटूपुटीच्या खेळात एक अनोळखी मुलगा आला. त्याची मी मनानेच पूजा करून जेवायला मनानेच घातले. तेव्हा त्याने मला ही सिध्दी दिली." नागनाथ म्हणाला. कोशधर्म त्याला म्हणाला, "तो भगवान दत्तात्रेय होता. तुझ्यावर त्याची कृपा झाली." नागनाथ चकित झाला. नागनाथाला दत्तांच्या भेटीची फारच उत्कंठा वाटू लागली.
नागनाथाची उत्कंठा वाढली. त्याने दत्तांचा शोध घेण्यास सुरूवात केली. कोल्हापुरात त्याला लोक सांगु लागले, "दत्तगुरू केव्हातरी गुप्तपणे भिक्षा मागून निघुन जातात.” "दत्तगुरूच्या पुण्यक्षेत्रातच फक्त अन्न घेतात." नागनाथाने ठरविले की, कोल्हापुरात आपण गावभोजन घालावे. घरी अन्नच शिजविले नाही, तर दत्तांना त्या भोजनाच्या ठिकाणी यावे लागेल. मग त्यांची आपली भेट होईल. नागनाथाने देवीच्या पुजाऱ्याला सिध्दीने अन्नाच्या व सोन्याच्या राशी निर्माण करून दाखविल्या व त्याला गावभोजनाची तयारी करण्यास सांगितले.
अध्याय फलश्रुती:- साप व विंचू यांचे विष उतरून मनुष्य बरा होईल.
अध्याय समाप्त
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.