Subscribe Us

श्री नवनाथ भक्तिसार अध्याय ३७ (मराठी भाषांतर ) || navnath bhaktisar adhyay 37

।। श्री नवनाथ भक्तीसार ।।

 अध्याय :-३७ 

  नागनाथांनी पन्नरास्त्राने हजारो तक्षक निर्माण केले 


।। श्री गणेशाय नमः ।। श्री सरस्वत्यै नम: ।। श्री गुरूभ्यो नम: ।। श्री नवनाथ सिद्धांना नमस्कार असो.

                नागनाथाने पुजाऱ्याकडून कोल्हापुरातील सर्वच लोकांना दोन्ही वेळा दररोज जेवणावळ देण्याविषयी दवंडी पिटविली. दररोज गाव जेवण सुरू केले. नागनाथ मात्र दत्तगुरू केव्हा भेटतील याची वाट पहात होता. कोरडी भिक्षा मागुनच एकदा दत्तगुरू निघुन गेले. आपण काशीत ज्याला अन्नसिध्दी दिली, तोच नागनाथ नेमका कोल्हापुरात येऊन अन्नदान करतो, आणि तेही माझ्या भेटीसाठीच असेही दत्तगुरूंनी ताडले; पण त्यांनी कोरडी भिक्षा मागितली व ते निघुन गेले. दत्त भेटत नाहीत म्हणून नागनाथाने चौकशी चालवली, "कोणी भिक्षेकरी येतो का?" लोक म्हणाले, "एक भिक्षेकरी कोरडी भिक्षा मागून निघून जातो." 

                   मग नागनाथ म्हणाला, "परत आला की मी देऊन ठेवतो ती कोरडी भिक्षा त्याला घाला, पण देतांना असे सांगा की, "नागनाथाने दिलेल्या दाण्यांतलेच (धान्य) दाणे आम्ही देतो, मग त्याने जर तीही मिक्षा घेतली नाही तर मला येऊन सांगा" असे सांगून पाचपन्नास लोकांना त्याने वस्त्रात धान्य बांधून दिले. एकदा दारात तो भिक्षेकरी आला. लगेच एक माणूस त्याला दोन मुठी तांदुळ घालुन म्हणाला "महाराज, ही भिक्षा घालतोय ती तो सिध्द नागनाथ आला आहे हे त्याच्या कृपेने शक्य आहे." ते वाक्य ऐकताच भिक्षेकरी पटकन झोळी घेऊन दोन पावले मागे सरकला. "नाही नाही, आम्हाला नागनाथाचे अन्न नको." तो असे बोलतो तोच इतर लोकांनी गुपचुप जाऊन नागनाथाला ती बातमी सांगितली नागनाथ तत्काळ धावला. त्याने पुढे जाऊन त्यांच्या पायांना मिठी मारली आणि तो म्हणाला, "गुरू महाराज, मी तुमच्याशिवाय घोर रानात की हो पडलो आहे!" तेव्हा दत्तांनी त्याला प्रेमाने उठविले, माझ्या बाळा, रडू नको चल मी तुला या शोकसागरातून वर काढतो. असे म्हणून त्याला एकीकडे नेले आणि ज्ञानदीक्षा दिली. त्याचे सर्व अज्ञान त्याच क्षणी समूळ नष्ट झाले. सर्वत्र त्याला ब्रह्मस्वरूप दिसू लागले.

                     त्यानंतर नागनाथ आणि दत्त हे दोघे कोल्हापूर सोडून व्यानमंत्राच्या साह्याने शीघ्र गतीने काशी क्षेत्रात गेले, काशीतून ते दोघे मग बद्रिकाश्रमात गेले. तेथे दत्तांनी नागनाथाची व भगवान शंकराची भेट घडविली. त्याने नागनाथ हाच आविर्होत्र नारायण आहे हे कळताच दत्ताच्या विनंतीवरून नाथाला सर्व विद्यांत प्रवीण केले, बारा वर्षे तप करून घेतले. नाथपंथाचा वेश व सर्व सिध्दी दिल्या. मग वरदान देणाऱ्या सर्व देवांना नाथाने संतुष्ट केले. दत्तांनी नंतर नागनाथाला तीर्थयात्रा करण्यास पाठविले. दत्त गिरनार पर्वतावर गेले. नागनाथ गावोगावी हिंडू लागला. तो बालेघाटात आला. त्याचा प्रभाव लोकांत फारच वाढला. लोकांच्या आग्रहावरून तो वडवाल या गावी राहू लागला. पुढे एकदा त्याची कीर्ती ऐकून मच्छिंद्रनाथ त्याची भेट घ्यायला आला. तो मच्छिंद्राच्या पाया पडला. प्रेमाने मच्छिंद्र नागनाथ एकत्र राहिले.

               काही दिवसांनी मच्छिंद्राने विषय काढला. "नागनाथा, दारावर शिष्य पहारेकरी का ठेवतोस?" नागनाथ म्हणाला, “मी असतो ध्यानस्थ. वाटेल तेव्हा लोक येतात, मला त्रास देतात म्हणून!" मच्छिंद्र म्हणाला, "अरे, पण आपला जन्मच परोपकारासाठी आहे. अवतार घेऊन आलो ते दीनोध्दार करायला. तू सर्वांना मुक्तद्वार ठेव!" नागनाथाने ते मान्य केले. मग मच्छिंद्र तीर्थयात्रेसाठी निघून गेले. नागनाथ सर्वांना भेट देऊ लागला. सर्वांची दु:खे दुर करू लागला. नागनाथाने आपल्या भक्तांचा उध्दार केला. पुढे त्यांनी समाधी घेतली. 

अध्याय फलश्रुती:-  दु:शीलपणा संपून विद्या प्राप्त होईल    . 

   अध्याय समाप्त 

     || कृष्णार्पणमस्तू || 

मागील अध्याय⬅️

➡️पुढील अध्याय

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या