संक्षिप्त श्री गुरुचरित्र
अध्याय १ ते ५२
अध्याय १. कल्याण आणि गुरुकृपा होईल.
अध्याय २. सद्गुरुप्राप्ती होईल आणि गुरुभक्ती दृढ होईल.
अध्याय ३. सद्ग्रंथ श्रवणाची गोडी लागेल, संकटात रक्षण होईल.
अध्याय ४. विवेक, धैर्यादी सदगुण वाढतील, दत्तात्रेयांची कृपा होईल.
अध्याय ५. अतिथी संतुष्ट होतील, संतती पराक्रमी होईल.
अध्याय ६. कठीण प्रसंगात योग्य मार्गदर्शन प्राप्त होईल.
अध्याय ७. महापातकांचे निरसन होईल, गोकर्ण यात्रेचे पुण्य मिळेल.
अध्याय ८. संतती विद्वान होईल, शनिप्रदोष व्रताचे पुण्य मिळेल.
अध्याय ९. ऐश्वर्यप्राप्ती होईल.
अध्याय १०. संकटांचे निरसन होऊन कार्यसिद्धी होईल.
अध्याय ११. संततीविषयी वाटणारी चिंता दूर होईल.
अध्याय १२. कर्तव्यपूर्तीसाठी केलेले प्रयत्न सफल होतील.
अध्याय १३. आरोग्यप्राप्ती होईल. पचनक्रियेच्या तकरारी दूर होतील.
अध्याय १४. अकस्मात आलेल्या संकटाचे निवारण होईल, रक्षण होईल.
अध्याय १५. तीर्थक्षेत्रांची यात्रा घडेल, साधनेसाठी एकांत लाभेल.
अध्याय १६. गुरुसेवेत प्रमाद घडणार नाहीत, गुरुकृपेची प्रचिती येईल.
अध्याय १७. विद्याभ्यासात प्रगती होईल, फलांमध्ये प्रावीण्य मिळेल.
अध्याय १८. कर्जमुक्ती लवकर होईल. घरात चोरी होणार नाही.
अध्याय १९. साधुसंतांची सेवा घडेल. भाग्योदय होईल.
अध्याय २०,२१. संततीवरचे गंडांतर टळेल, संततीचे आरोग्य चांगले राहील.
अध्याय २२. पशुधन सुरक्षित राहील, दुधदुभत्याची कमतरता पडणार नाही.
अध्याय २३. स्वतःच्या मालकीचे घर होईल, प्रतिष्ठा प्राप्त होईल.
अध्याय २४. गैरसमज दूर होतील, स्वभावातील दोष जातील.
अध्याय २५. अंगी विनम्रता बाणेल, वृत्ती निरहंकार होईल.
अध्याय २६. आपापल्या अभ्यास विषयात विशेष प्रावीण्य मिळेल.
अध्याय २७. वादविवादात जय मिळेल.
अध्याय २८. वृत्ती सन्मार्गरत आणि धर्मानुगामी होईल.
अध्याय २९. साक्षात्कारी सत्पुरुषाचा सहवास लाभेल. उद्धार होईल.
अध्याय ३०. पतीविषयी वाटणारी चिंता दूर होईल, पतिसहवास लाभेल.
अध्याय ३१. दांपत्यांमधील मतभेद दूर होतील, संसार सुखाचा होईल.
अध्याय ३२. सौभाग्य अखंड राहील, परदेशस्थ पती सुखरूप परत येईल.
अध्याय ३३. रुद्राक्ष धारण केल्याचे पुण्य मिळेल, शिवकृपेने मंगल होईल.
अध्याय ३४. रुद्रपाठाचे पुण्य मिळेल. संतती दीर्घायुषी होईल.
अध्याय ३५. कठीण कार्यात यश मिळेल. पतीवरील गंडांतर टळेल.
अध्याय ३६. पतिनिंदेचा दोष जाईल, स्वधर्माचरणाचे महत्त्व पटेल.
अध्याय ३७. व्यवहारज्ञान वाढेल, गृहस्थाश्रमात सुख लाभेल.
अध्याय ३८. घरात अन्नधान्याची कमतरता पडणार नाही.
अध्याय ३९. संतानप्राप्ती होईल, अश्वत्थ सेवेचे पुण्य मिळेल.
अध्याय ४०. गुरूवरील निष्ठा दृढ होईल, शंकरकृपा करील.
अध्याय ४१, ४२. गुरुसेवा घडेल, काशीमहायात्रेचे पुण्य मिळेल.
अध्याय ४३. वैभव प्राप्त होईल. श्रीकृष्णकृपा होईल.
अध्याय ४४. गुरुतत्त्व आणि शिवतत्त्व एकच आहे याची अनुभूती येईल.
अध्याय ४५. त्वचाविकार बरे होतील, काव्यप्रतिभा लाभेल.
अध्याय ४६. द्वैतभावाचे निरसन होईल.
अध्याय ४७. गुरूंचा, संतांचा व साधुजनांचा सहवास लाभेल.
अध्याय ४८. धनधान्याची समृद्धी येईल. शेती व्यवसायात यश मिळेल.
अध्याय ४९. गाणगापूर यात्रेचे पुण्य श्रीगुरुकृपा करतील.
अध्याय ५०. दुःखद व्याधी बऱ्या होतील. दुरुस्त गुरूची साक्ष पटेल.
अध्याय ५१,५२. गुरूचा विरह होणार नाही, श्रीगुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाचे पुण्य मिळेल.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.